सहज सुचलंच्या मुख्य संयोजिकापदी रंज्जू दिलीप मोडक तर सहसंयोजिकापदी नलिनी आडपवार यांची नियुक्ती!
चंद्रपूर – प्रांजू मखरे 
संगीत, क्रीडा, साहित्यिक, शैक्षणिक, सामाजिक व कला क्षेत्रातील नवोदितांना प्रोत्साहन देणा-या महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलंच्या मुख्य संयोजिकापदी चंद्रपूरच्या समाजसेविका व योगशिक्षिका रंज्जू दिलीप मोडक यांची नियुक्ती करण्यात आली तर मूल शहरातील समाजसेविका तथा नगरसेविका नलिनी दिनेश आडपवार यांची याच गृपच्या सहसंयोजिकापदी निवड करण्यात आली असल्याचे या गृपच्या नागपूरच्या मुख्य मार्गदर्शिका मायाताई कोसरे व राजूरा येथील जेष्ठ साहित्यिक ॲड.मेघा धोटे यांनी आज चंद्रपूरात या प्रतिनिधीशी बोलतांना सांगितले.
रंज्जू मोडक ह्या गेल्या तीन वर्षांपासून सहज सुचलंची धूरा सांभाळीत असून त्यांना परत संधी देण्यात आली.
नलिनी आडपवार यांच्यावर दुसऱ्यांदा या पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
आजच्या घडीला या गृपवर शेकडोंच्या घरात सदस्यगण आहेत.त्यात चंद्रपूर गडचिरोली शिवाय नागपूर,मुंबई, ठाणे,नाशिक, यवतमाळ, अमरावती आदिं मोठ्या शहरातील महिला सदस्यांचा समावेश आहे.


