Home Breaking News • कोंबडा बाजारावर भद्रावती पोलिसांची धाड! • एकाला केली पोलिसांनी अटक

• कोंबडा बाजारावर भद्रावती पोलिसांची धाड! • एकाला केली पोलिसांनी अटक

40

• कोंबडा बाजारावर भद्रावती पोलिसांची धाड!
• एकाला केली पोलिसांनी अटक

भद्रावती – विशेष प्रतिनिधी

भद्रावती तालुक्यात एका ठिकाणी पोलिसांनी कोंबड बाजारावर धाड टाकली असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
पोलिसांना गुप्त माहिती मिळाली कि गौरजा येथील झुडपी जंगलाच्या परिसरात काही जण कोंबडा बाजार भरवून त्यावर पैशांची बाजी लावून हार-जीत जुगाराचा खेळ खेळत आहेत.
त्या माहितीच्या आधारे पंच व पोलिसांनी उपरोक्त ठिकाणी १८ जानेवारीला धाड टाकली.
या दरम्यान काही इसम कोंबड्यांवर पैशांची बाजी लावताना आढळून आले. पोलिसांची चाहूल लागताच काही आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. तर एका आरोपीला ताब्यात घेऊन त्यास अटक करण्यात आली. घटनास्थळावरून चार दुचाकी वाहने, नगद रक्कम, तीन जखमी कोंबडे, दोन लोखंडी धारदार कात्या असा एकूण १,५६,३०० रुपये किंमतीचा मुद्देमाल भद्रावती पोलिसांनी जप्त केला आहे.
सदरहू गुन्ह्यात एकूण पाच आरोपी असून, चौघे फरार आहेत. पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहेत.
ही धडक कारवाई पोलिस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलिस अधीक्षक ईश्वर कातकाडे, उपविभागीय पोलिस अधिकारी संतोष बाकल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक योगेश्वर पारधी, सहाय्यक पोलिस निरीक्षक विरेंद्र केदारे तसेच गुन्हे शोध पथकातील पोउपनि .गजानन तुपकर, महेंद्र बेसरकर, धर्मराज मुंडे, जगदीश झाडे, विश्वनाथ चुदरी, अनुप आष्टुनकर, गोपाल आतकुलवार, भारत पुसांडे, खुशाल कावळे, संतोष राठोड, योगेश घाटोडे, किरण चहांदे यांनी यशस्वीपणे पार पाडली.