गुन्हे प्रगटीकरण विभागाची धडाकेबाज कारवाई !
राजुरा( चंद्रपूर)-विशेष प्रतिनिधी

चंद्रपूर जिल्ह्याच्या राजुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आलेल्या कारवाईत नुकताच अवैधरीत्या साठवून ठेवलेला डिझेलचा साठा पकडण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार कॅम्प नं.१७ सास्ती येथे बोलेरो कॅम्पर क्र.MH ३४ BZ ८६६५ चा फरार चालक व त्याचे इतर दोन तीन सहकारी याने कोणतीही परवानगी नसताना एकूण १०२० लिटर डिझेल लोकांचे जीवितास धोका होईल अशा निष्काळजीपणे व पुरेसा बंदोबस्त न करता अवैध रित्या साठा करून ठेवल्याचे आढळून आले. सदरहु ठिकाणी छापा टाकून पंचनामा करून अंदाजे किंमत रू .९,९१,८०० किमतीचा डिझेल साठा व साठवणुकीसाठी वापरलेली बोलेरो गाडी /प्लास्टिक ड्रम/प्लास्टिक कॅन जप्त करण्यात आले आहे.या प्रकरणी राजुरा पोलीस ठाण्यात अप.क्र.१८/२६ कलम २८७,३(५) BNS अन्वये आरोपीविरूद्ध गुन्हा नोंद करून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. पुढील तपास पोलिस उप निरीक्षक दिपक ठाकरे यांनी करीत आहेत.
सदरची कारवाई पोलिस अधिक्षक सुदर्शन मुमक्का ,अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार राजुरा यांचे मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक सुमित परतेकी यांचे नेतृत्त्वाखाली गुन्हे शोध पथक इन्चार्ज पोलिस उप निरीक्षक दिपक ठाकरे, पराग उल्लेवार, ASI किशोर तुमराम, पोहवा पुंडलिक परचाके, विक्की निर्वाण ,महेश बोलगोडवार, मिलिंद जांभूळे,शफीक शेख यांनी केली आहे.


