• वैजयंती गहुकर यांच्या योगा क्लासला अनेकांची उपस्थिती!
• दुर्गापूरच्या जनता विद्यालयात क्लासचे आयोजन!
चंद्रपूर : प्रतिनिधी
दुर्गापूर येथील जनता विद्यालयात दि.१७

जानेवारीला एका योगा क्लासचे आयोजन करण्यात आले होते.या क्लासला शाळेच्या मुख्याध्यापिका सुनिता पोटे सहायक शिक्षक राजुरकर व शाळेतील शिक्षक, शिक्षिका उपस्थित होते. चंद्रपूरच्या वैजयंती फिटनेस फाउंडेशन योगा क्लासच्या वतीने योगाचे सत्र घेण्यात आले.त्यात योग शिक्षिका वैजयंती विकास गहूकर यांनी योगा विषयी सविस्तर माहिती दिली.आसन आणि शिवाजी महाराजांच्या गाण्यावर व्यायाम घेऊन कठीण आसनाचे त्यात चक्रासन, हलासन , सर्वांगासन ,सुप्तवज्रासन, उत्तान मंडूकासन ,मच्छासन प्रात्यक्षिक करून दाखविले व त्यांचे फायदे मुलांना समजावून सांगितले. त्यांच्या सहयोगी अंजली मेश्राम यांनी लाठी काठी बद्दलची माहिती उपस्थितीतांना दिली.
मुख्याध्यापिका सुनिता पोटे यांनी वैजयंती गहुकर ,विकास गहूकर व अंजली मेश्राम यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.


