घुग्घूस नगरपरिषदेची सभापती निवड बिनविरोध पार पडली
विजय वड्डेटीवारांच्या नेतृत्वात नगरपरिषदेवर काँग्रेसचा झेंडा

सुवर्ण भारत:पंकज रामटेके (सहाय्यक जिल्हा प्रतिनिधी चंद्रपूर)
घुग्घूस : शहरातील नगरपरिषदेची निवडणूक काँग्रेस पक्षाने बहुमताने जिंकल्यानंतर ही काँग्रेस पक्षाला सत्ता स्थापना करण्या करीता प्रचंड असा टोकाचा संघर्ष करावा लागला यानंतर सभापती पदाला घेऊन ही काँग्रेस पक्षात प्रचंड रस्सीखेच निर्माण झाला होता मात्र माजी मंत्री विजय वड्डेटीवार यांनी विशेष लक्ष दिल्याने काँग्रेस पक्षातील अंतर्गत वाद संपुष्टात येऊन नगरपरिषदेत काँग्रेस बिनविरोध निवडून आल्याने घुग्घूस नगरपरिषदेचे निर्माणात व सत्ता संपादनात वड्डेटीवार हेच शिल्पकार ठरलेत
घुग्घूस नगरपरिषदेच्या विषय समित्यांचे गठण आज दिनांक 21 जानेवारी रोजी करण्यात आले.
समित्यांचे गठण करण्यासाठी नगरपरिषदेच्या सभागृहात नवनिर्वाचित सदस्यांची विशेष सभा उप- विभागीय अधिकारी तथा पिठासन अधिकारी यांच्या अध्यक्षते खाली घेण्यात आली
प्रत्येक विषय समितीत पाच सदस्य असतील तीन काँग्रेस व दोन भाजपा असा निर्णय घेण्यात आला
सदर निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या सर्व नगरसेवकांच्या वतीने नगरपरिषदेचे उपाध्यक्ष राजुरेड्डी यांना सर्वानुमते पानी पुरवठा विभागाच्या सभापती पदी निवड करण्यात आली.
सार्वजनिक बांधकाम व क्रीडा समितीच्या सभापती पदी रोशन पचारे, नियोजन विकास व सांस्कृतिक कार्य समिती सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ( अजित पवार गटाचे ) रवीश सिंग
यांची निवड करण्यात आली.
स्वच्छता वैद्यक व सार्वजनिक आरोग्य सभापतीपदी नुरूल सिद्दीकी यांची निवड करण्यात आली
महिला व बाल कल्याण सभापतीपदी माला मेश्राम व उप सभापतीपदी श्रुतिका कलवलं यांची निवड करण्यात आले.
सदर निवडी नंतर कार्यकर्त्यांनी पुष्पहार घालून फाटक्यांची जोरदार आतिषबाजी करण्यात आली


