Home Breaking News बल्लारपूर नगरपरिषद : उपनगराध्यक्षपदी देवेंद्र आर्य यांचा पदभार विविध समित्यांच्या सभापतिपदी...

बल्लारपूर नगरपरिषद : उपनगराध्यक्षपदी देवेंद्र आर्य यांचा पदभार विविध समित्यांच्या सभापतिपदी एकमताने निवड

202

बल्लारपूर नगरपरिषद : उपनगराध्यक्षपदी देवेंद्र आर्य यांचा पदभार

विविध समित्यांच्या सभापतिपदी एकमताने निवड

बल्लारपूर : बल्लारपूर नगरपरिषदेची विशेष बैठक मंगळवार, दि. २० जानेवारी २०२६ रोजी दुपारी ४ वाजता राजे बल्लाळशाह नाट्यगृह येथे पार पडली. पीठासीन अधिकारी तथा मुख्याधिकारी विशाल वाघ यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी नगरपरिषदेच्या विविध विषय समित्यांचे सभापती व स्थायी समिती सदस्यांची निवड करण्यात आली.

या बैठकीत नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष देवेंद्र आर्य यांची स्वच्छता, वैद्यकीय व सार्वजनिक आरोग्य समितीच्या पदसिद्ध सभापतीपदी एकमताने निवड करण्यात आली.

तसेच अब्दुल करीम शेख – सार्वजनिक बांधकाम समिती,इस्माईल ढाकवाला – पाणीपुरवठा व जलनिस्सारण समिती,पवन मेश्राम – विकास व नियोजन समिती,प्रियंका थुलकर – शिक्षण समिती,मेघा भाले – महिला व बालकल्याण समिती, या समित्यांच्या सभापतिपदी नियुक्ती करण्यात आली.

याशिवाय माजी नगराध्यक्ष छाया मडावी, लखनसिंग चंदेल व करुणा नरसिंह रेब्बावर यांची स्थायी समिती सदस्य म्हणून निवड करण्यात आली.

नगराध्यक्ष अलका अनिल वाढई, मुख्याधिकारी विशाल वाघ तसेच विशेष सभेला उपस्थित असलेल्या सर्व नगरपरिषद सदस्यांनी नवनिर्वाचित सभापती व स्थायी समिती सदस्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

उपनगराध्यक्ष देवेंद्र आर्य यांनी पदभार स्वीकारला
दरम्यान, बुधवार दि. २१ जानेवारी २०२६ रोजी दुपारी १२ वाजता नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष देवेंद्र आर्य यांनी अधिकृतरित्या पदभार स्वीकारला. यावेळी मुख्याधिकारी विशाल वाघ व नगराध्यक्ष अलका अनिल वाढई उपस्थित होत्या.

या प्रसंगी नगरपरिषद सदस्य, अधिकारी, कर्मचारी, पत्रकार तसेच शहरातील मान्यवर नागरिकांनी उपस्थित राहून उपनगराध्यक्ष देवेंद्र आर्य यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.