Home Breaking News #Aalapalli • आलापल्ली येथे ‘महाशिव १२ ज्योतिर्लिंग महापडी शिवपूजा’ उत्साहात संपन्न ...

#Aalapalli • आलापल्ली येथे ‘महाशिव १२ ज्योतिर्लिंग महापडी शिवपूजा’ उत्साहात संपन्न • माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या हस्ते विधिवत पूजन

151
Oplus_131072

#Aalapalli #Gadchiroli 
• आलापल्ली येथे ‘महाशिव १२ ज्योतिर्लिंग महापडी शिवपूजा’ उत्साहात संपन्न

• माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या हस्ते विधिवत पूजन

सुवर्ण भारत: शंकर महाकाली (संपादक)

आलापल्ली :- महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर आलापल्ली येथील शिवदत्त अय्यप्पा मंदिरात ‘महाशिव १२ ज्योतिर्लिंग महापडी शिवपूजा’ हा भव्य धार्मिक कार्यक्रम भक्तिभावाने आणि उत्साहात पार पडला. या विशेष पूजाविधीचे विधिवत पूजन अहेरी इस्टेटचे राजे तथा माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.

याप्रसंगी राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी भगवान शंकराच्या चरणी क्षेत्रातील जनतेच्या समस्या दूर व्हाव्यात, सर्वांच्या जीवनात सुख, शांती, समृद्धी व समाधान नांदावे, अशी मनोभावे प्रार्थना अर्पण केली. शिवभक्तांच्या उपस्थितीमुळे संपूर्ण परिसर भक्तीमय वातावरणाने भारावून गेला होता.

पूजेनंतर राजे साहेबांच्या हस्ते उपस्थित शिवभक्तांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. तसेच मंचेरियल येथील काली ग्रुपच्या भक्तीमय संगीत सादरीकरणाने कार्यक्रमात अधिकच आध्यात्मिक रंग भरला. भाविकांनी या भक्तीमय संगीताचा मनमुराद आनंद घेतला.

या धार्मिक कार्यक्रमास श्री नरहरी शर्मा गुरुस्वामी, श्रीनिवास बिट्टीवार गुरुस्वामी, सुरेश स्वामी रामगिरवार, सुधाकर स्वामी उल्लीवार, संदीप स्वामी झाडे, मुनेश स्वामी आत्राम, तिरुपती स्वामी सप्पीडवार, जमुना स्वामी नैताम, नानय्या येलेश्वराम यांच्यासह अय्यप्पा मंदिर समितीचे पदाधिकारी, ग्रामस्थ व मोठ्या संख्येने शिवभक्त उपस्थित होते.