Home Breaking News • चंद्रपूरात हिराई संगीत महोत्सव! • जेष्ठ समाजसेविका प्रभावती मुठाळ यांना...

• चंद्रपूरात हिराई संगीत महोत्सव! • जेष्ठ समाजसेविका प्रभावती मुठाळ यांना मिळणार सन्मान पुरस्कार

44

• चंद्रपूरात हिराई संगीत महोत्सव!

• जेष्ठ समाजसेविका प्रभावती मुठाळ यांना मिळणार सन्मान पुरस्कार

चंद्रपूर : किरण घाटे

चंद्रपुर शहरातील अग्रगण्य सांस्कृतिक संस्था

Oplus_131072

स्नेहांकित दरवर्षी हिराई संगीत महोत्सव आयोजित करीत असते .
ह्यावर्षी देखील हा महोत्सव दि.14 आणि 15 फेब्रुवारी 2026 ला स्थानिक प्रियदर्शनी इंदिरा गांधी सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. दि. 14 फेब्रुवारीला सुप्रसिद्ध युवा गायिका श्रुती बुजरबरुवा यांचे शास्त्रीय व उपशास्त्रीय गायनाचा कार्यक्रम आयोजित केला असून दिनांक15 फेब्रुवारी रोजी सुप्रसिद्ध अभिनेत्री व गायिका केतकी माटेगांवकर यांचा “रंग माझा वेगळा”हा अनोखा सुगम संगीताचा कार्यक्रम आयोजित केला आहे.
कार्यक्रमाची वेळ संध्याकाळी सात वाजता असून, आश्रयदाते व देणगीदारांसाठी विशेष आसन व्यवस्था केलेली आहे.रसिक प्रेक्षकांसाठी प्रवेश नि:शुल्क आहे.
यावर्षीचा राणी हिराई सन्मान पुरस्कार प्राध्यापिका व ज्येष्ठ समाजसेविका श्रीमती प्रभावती मुठाळ यांना जाहीर करण्यात आला आहे .
सदरहु पुरस्कार रसिकांच्या उपस्थितीत दि. 14 फेब्रुवारी रोजी सन्मानपूर्वक देण्यात येणार असल्याचे आयोजकांनी या प्रतिनिधीशी बोलताना आज सांगितले.