Home Breaking News घुग्घुस येथे भाजपतर्फे पंडित दीनदयाल उपाध्याय यांना अभिवादन पंडितजी हे थोर...

घुग्घुस येथे भाजपतर्फे पंडित दीनदयाल उपाध्याय यांना अभिवादन पंडितजी हे थोर विचारवंत, पत्रकार व एकात्म मानववादाचे प्रणेते – शहराध्यक्ष संजय तिवारी

145

घुग्घुस येथे भाजपतर्फे पंडित दीनदयाल उपाध्याय यांना अभिवादन

पंडितजी हे थोर विचारवंत, पत्रकार व एकात्म मानववादाचे प्रणेते – शहराध्यक्ष संजय तिवारी

सुवर्ण भारत:पंकज रामटेके
सहाय्यक जिल्हा प्रतिनिधी चंद्रपूर

घुग्घुस : येथील भारतीय जनता पक्षाच्या वतीने पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या पुण्यतिथीनिमित्त बुधवार, दि. ११ फेब्रुवारी रोजी स्थानिक पक्ष कार्यालयात विनम्र अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम आमदार किशोर जोरगेवार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.

यावेळी भाजपा शहराध्यक्ष संजय तिवारी यांच्या हस्ते पंडितजींच्या प्रतिमेला दीपप्रज्वलन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दोन मिनिटे शांतता पाळून त्यांना आदरांजली वाहिली.

मनोगत व्यक्त करताना संजय तिवारी म्हणाले की, पंडित दीनदयाल उपाध्याय हे एकात्म मानववादाचे प्रणेते होते. त्यांनी भारतीय राजकारणाला वैचारिक अधिष्ठान दिले. माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहीर तसेच आ. किशोर जोरगेवार यांचे मार्गदर्शन मला लाभत असून त्यांच्या विचारधारेनुसार कार्य करण्याची प्रेरणा मिळते, असेही त्यांनी नमूद केले.

तिवारी पुढे म्हणाले की, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या सहकार्याने पंडितजींनी भारतीय जनसंघ या पक्षाच्या स्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावली. ‘राष्ट्रधर्म’ दैनिक, ‘पांचजन्य’ साप्ताहिक आणि ‘ऑर्गनायझर’ या माध्यमांतून त्यांनी ‘राजकीय डायरी’ या स्तंभाद्वारे आपल्या विचारांचे प्रभावी मांडणी केली होती. त्यांचे विचार आजही कार्यकर्त्यांना मार्गदर्शक ठरत आहेत, असेही त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमास शहराध्यक्ष संजय तिवारी, स्वीकृत नगरसेवक निरीक्षण तांड्रा, नगरसेवक गणेश पिंपळकर, रामपाल वर्मा, संतोष नुने, इमरान खान, संजय भोंगळे, स्वप्नील वाढई, मुन्ना लोडे, रुपेश भटवलकर, महादेव देशमाने, प्रेम गंगाधरे, राजकुमार गोडसेलवार आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.