Home Breaking News #Chandrapur • सुपर वुमनचा जागतिक महिला दिन कार्यक्रम !

#Chandrapur • सुपर वुमनचा जागतिक महिला दिन कार्यक्रम !

84

#Chandrapur
• सुपर वुमनचा जागतिक महिला दिन कार्यक्रम !

सुवर्ण भारत: किरण घाटे
विदर्भ विशेष प्रतिनिधी

चंद्रपूर : सुपर वुमनच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त दि. 10.3.2026 ला हुसेन मज्जिद हॉल जुनोना रोड चंद्रपूर येथे विविध सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले .त्यात ग्रुप डान्स, सिंगल डान्स,फॅशन शो, व विविध प्रकारचे गेम्स घेण्यात आले.
वर्षा मदनकर यांनी स्त्री भ्रूण- हत्या यावरती एकपात्री नाट्यप्रयोग सादर केला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून नगरसेविका लताताई साव व N. G. O कार्यकर्ता बबीता राजभोर उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे संचालन अर्चना झाडे यांनी केले.
अंजली मेश्राम, प्रीती चव्हाण,हेमलता खोब्रागडे,अश्विनी देशमुख,अल्का मोटघरे,वैजयंती गहूकर,पपीता तामगाडगे,स्वाती नगराळे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाला महिला व पुरुषांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.