Home Breaking News नांदा फाटा येथे महिला दिनानिमित्त कर्तृत्ववान महिलांचा सन्मान; विविध स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद

नांदा फाटा येथे महिला दिनानिमित्त कर्तृत्ववान महिलांचा सन्मान; विविध स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद

115

नांदा फाटा येथे महिला दिनानिमित्त कर्तृत्ववान महिलांचा सन्मान; विविध स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद

सुवर्ण भारत: मनोज गोरे ,प्रतिनिधी, चंद्रपूर

कोरपना :तालुक्यातील नांदा फाटा येथे तनिष्का व्यासपीठ,सक्सेस अबॅकस अकॅडमी नांदा, व श्रीराम दर्शन बहुउद्देशीय संस्था,नांदा यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात कर्तृत्ववान महिलांचा सन्मान, तनिष्का सभासद नोंदणी,समूह नृत्य स्पर्धा, रॅम्प वॉक स्पर्धा, महिला बचत गट मार्गदर्शन मेळावा तसेच सक्सेस अबॅकस अकॅडमी नांदा यांच्या ऑनलाईन नॅशनल लेव्हल स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ. मेघाताई निलेश ताजने होत्या. प्रमुख अतिथी म्हणून सौ. डिसुजा मॅडम, सौ. पूजाताई मडावी, विकास चिने, दरेकर सर व प्रफुल बोडाले उपस्थित होते.
कार्यक्रमात सौ. पूर्णिमा श्रीवास्तव देऊळकर, डॉ. स्नेहल ठाकरे, हर्षाली खारकर व सौ. राणी लिपटे या कर्तृत्ववान महिलांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. तसेच विविध स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांना भेटवस्तू व सन्मानचिन्ह देण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक तनिष्का विभाग समन्वयक नेहा वासाडे यांनी केले. यावेळी संदीप खिरटकर यांनी संस्थेमार्फत महिला सक्षमीकरणासाठी महिला बचत गट प्रशिक्षण कार्यशाळा राबविण्यात येणार असल्याची माहिती दिली. तर सौ. राणी लिपटे यांनी बचत गट स्थापन करण्याचे फायदे व महिलांसाठी उपलब्ध संधी याबाबत मार्गदर्शन केले.
तसेच तनिष्का व्यासपीठ सभासद नोंदणी अभियान या कार्यक्रमाच्या माध्यमातून नांदा फाटा परिसरातून सभासद नोंदणीला सुरुवात करण्यात आली.
कार्यक्रमाचे संचालन सौ. संगीता बलकी यांनी केले तर प्रमोद खिरटकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आदित्य वासाडे, रोशन चिने व युगल चटकी यांनी विशेष परिश्रम घेतले.