Home Breaking News कोरपना बस स्थानक चौकात काँग्रेसचे भाजपविरोधात जोरदार आंदोलन

कोरपना बस स्थानक चौकात काँग्रेसचे भाजपविरोधात जोरदार आंदोलन

73

कोरपना बस स्थानक चौकात काँग्रेसचे भाजपविरोधात जोरदार आंदोलन

कोरपना ( मनोज गोरे तालुका प्रतिनिधी) 

कोरपना  : बस स्थानक चौकात आज भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने भाजप सरकारच्या धोरणांविरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली. तालुका अध्यक्ष उत्तमराव पेचे यांच्या नेतृत्वात शेकडो कार्यकर्त्यांनी मोर्चा काढत निषेध नोंदविला.
यावेळी आंदोलकांनी आरोप केला की, केंद्र व राज्यातील भाजप सरकारकडून सामान्य जनतेची लूट सुरू असून महागाईमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. जीवनावश्यक वस्तूंमध्ये सातत्याने दरवाढ होत असल्याने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे.
तसेच, घरगुती गॅस वितरणासाठी सुरू करण्यात आलेल्या ऑनलाईन प्रक्रियेबाबतही तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. अनेक नागरिकांना ओटीपी न मिळणे, गॅस बुकिंग न होणे अशा अडचणींना सामोरे जावे लागत असल्याने गॅस मिळणे कठीण झाले असल्याचे आंदोलकांनी सांगितले.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडेही सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करण्यात आला. कापसाला तुटपुंजा भाव मिळत असून जिनिंगवर कापूस खरेदी होत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत, अशी भावना व्यक्त करण्यात आली.
या आंदोलनात जिल्हा मध्यवर्ती बँक संचालक विजयराव बावणे, तालुका अध्यक्ष उत्तम पेचे, भाऊराव पाटील, चव्हाण, सुरेश पाटील मालेकर, राहुल मालेकर, सचिन मालेकर, विश्वास पा. मालेकर, विलास आडे, रोशन मरापे, वहाब भाई, यादव दरने, शगीर भाई, मनोज केळझकर, इस्माईल भाई, निसार भाई तसेच लिंगाजी कुमरे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.
या सर्व समस्यांच्या निषेधार्थ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलनानंतर कोरपना तहसीलदारांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन देण्यात आले.
या आंदोलनामुळे काही काळ बस स्थानक परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.