घुग्घुस शहरात मोकाट कुत्राच्या हैदोस; नागरिक भयभीत प्रशासनाचे दुर्लक्ष: पंकज रामटेके
काही नगरसेवक जोमात अन्य नगरसेवक कोमात तर नागरिक व्हेंटिलेटरवर

सुवर्ण भारत: शंकर महाकाली
घुग्घुस शहरात गेल्या काही दिवसापासून मोकाट कुत्र्यांच्या संख्येत वाढ झाली असून, या कुत्र्यांनी नागरिकांमध्ये चांगलीच दहशत निर्माण केली आहे.अनेक वार्डा-वार्डातील रस्ते गल्ल्याव तसेच परिसरातील सार्वजनिक ठिकाणी कुत्र्यांचे कळप फिरत असुन बरेच वर्तमान पेपर मध्ये आले अनेक नागरिक जख्मी केले तरीही प्रशासनाला जाग आली नाही,कुंभकर्ण वाणी झोपी गेले असे नागरिकांकडून बोलण्यात येत असते.तसेच काही वार्डा-वार्डातील नागरिकांना चावा घेतले.
तसेच अनेक ठिकाणी नागरिकांना चावा घेतल्याच्या घटना समोर आल्याची चर्चा चांगलीच रंगु लागली, यामुळे जनतेच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
सध्या पण नवनियुक्त नगरसेवक सत्ताधारी, बिनसत्ताधारी आपली पुरण पोळी शेखुन राहली एकमेकाचे कारणे दाखवुन प्रसिध्द करित असतात नागरिकांकडून चर्चा चाय टपरीवरच करण्यात येत आहे,तसेच कुणी नगरसेवक सांस्कृतिक कामात व्यस्त तर कुणी कुपन देण्यात तर कुणी पाण्याची टॅकर देण्यात तर कुणी कंपनीत नियंत्रण करण्याची मस्त बस सर्व सेवक अपना काम बनता भाड मै जाये जनता असी चर्चा रंगली घुग्घुस शहर चे नागरिक व्हेंटिलेटरवर तर नगरसेवक पोस्टर्स स्टंट, रॅली काढण्यात मस्त त्यापेक्षा भाषण देण्यात मस्त येथील काही नगरसेवक जोमात तर काही कोमात, काही नगरसेवक राजकारण बिजनेस करीत आहे तर काही नगरसेवक जोमात नाहीतर कोमात गेले आहे.
असी नागरिकांकडून वारंवार बोलण्यात येत असते.
सकाळी शाळेत जाणारी मुले,मार्निग वार्क जाणारे नागरिक आणि फिरण्यासाठी बाहेर पडणारे वृध्दांवर हे कुत्रे अचानक हल्ला करत आहेत.असे ऐकायला मिळत आहे.रात्रीच्या वेळी दुचाकीस्वारांच्या मागे लागल्यामुळे अनेक छोठे- मोठे अपघातही घडले आहेत.अनेक नागरिक कुत्र्यांच्या चाव्यामुळे जख्मी झाले असुन स्थानिक रुग्णालयात उपचार घावे लागत आहेत…
घुग्घुस शहरातील काही नगरसेवक जोमात अन्य नगरसेवक कोमात तर शहरातील नागरिक चालत आहे व्हेंटिलेटरवर असेही बोलण्यात येत आहे.
