#Pombhurna
• पोंभुर्णा मंडळात पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाभियान अंतर्गत निवासी प्रशिक्षण वर्गाचा उत्साहात शुभारंभ
सुवर्ण भारत : शंकर महाकाली
चंद्रपूर जिल्हा (ग्रामीण) अंतर्गत बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील पोंभुर्णा मंडळात पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाभियान अंतर्गत निवासी प्रशिक्षण वर्गाचा शुभारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. Chandrapur district मधील Ballarpur विधानसभा क्षेत्रातील Pombhurna येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
या प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन माजी जिल्हा परिषद अध्यक्षा संध्या गुरनुले यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटन सत्राला भारतीय जनता पार्टी चे जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, विधानसभा संघटन प्रभारी रामजी लाखिया, मंडळ जिल्हा सचिव साकेत भानारकर, मंडल अध्यक्ष हरी पाटील ढवस तसेच जिल्हा कोषाध्यक्ष मनोज सिंघवी आदी मान्यवर प्रमुख उपस्थित होते.
या कार्यक्रमाला पोंभुर्णा मंडळातील सर्व प्रमुख पदाधिकारी, शक्ती केंद्रप्रमुख व बूथ प्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रशिक्षण वर्गाच्या माध्यमातून संघटनात्मक कार्य अधिक बळकट करणे, कार्यकर्त्यांची क्षमता वाढवणे तसेच बूथ स्तरावर काम अधिक प्रभावीपणे राबवणे यावर भर देण्यात आला.
वक्त्यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सांगितले की, असे प्रशिक्षण वर्ग कार्यकर्त्यांना संघटनाची मूलतत्त्वे समजून घेण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरतात आणि त्यातून स्थानिक पातळीवर पक्षाची पकड अधिक मजबूत होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्व उपस्थितांनी समाधान व्यक्त केले.

