Home Breaking News १५ जूनपासून शाळा सुरू करण्याच्या निर्णयावर पालक-शिक्षकांत नाराजी

१५ जूनपासून शाळा सुरू करण्याच्या निर्णयावर पालक-शिक्षकांत नाराजी

49

१५ जूनपासून शाळा सुरू करण्याच्या निर्णयावर पालक-शिक्षकांत नाराजी

सुवर्ण भारत:किरण घाटे
विदर्भ विशेष प्रतिनिधी

चंद्रपूर : येणाऱ्या पुढील शैक्षणिक सत्र २०२६-२७ पासून संपूर्ण राज्यासोबतच विदर्भातील प्राथमिक शाळा १५ जूनपासून सुरू करण्याचे निर्देश शिक्षण संचालनालयाने दिले आहेत. या निर्णयामुळे विदर्भातील पालक व शिक्षकांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे.दरवर्षी विदर्भातील शाळा १ जुलैच्या आसपास सुरु होत असत.मात्र यावर्षी शिक्षण संचालनालयाकडून १५ जून पासून शाळा सुरू करण्याचे आदेश दिल्यामुळे पालक आणि शिक्षकांत नाराजीचे सूर उमटू लागले आहेत.

जून महिन्यातही विदर्भातील तापमान ४५ अंश असते.उन्हाच्या झळा या दरम्यान विदर्भाला बसत असतात.अनेक शाळांमधील वीज कनेक्शन बंद असून ग्रामीण शाळांमधील अपुऱ्या सुविधा,पंख्यांची सोय नसणे आणि विद्यार्थ्यांचे आरोग्य लक्षात घेता हा निर्णय बदलण्याची मागणी शिक्षक व पालकांकडून होत आहे.१ जुलैच्या जवळपास शाळा सुरु करण्यात याव्या अशी मागणी जोर धरू लागली आहे.

—————————————–

तीव्र उष्णता व शाळांमधील अपुऱ्या सुविधा लक्षात घेता विदर्भातील शाळा १५ जूनपासून सुरु करण्याचा हा निर्णय विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकतो.पूर्वीप्रमाणे १ जुलैच्या आसपास शाळा सुरू कराव्यात अशी रास्त मागणी पालक आणि शिक्षकांची आहे.सरकारने याचा विचार करावा.

◼️सुरेश डांगे, विभागीय अध्यक्ष, शिक्षक भारती नागपूर विभाग