भोंदू बाबा कडे जाण्यापासून महिलांना थांबवावे
(महाराष्ट्र अंनिसचे नागरिकांना आव्हान)
सुवर्ण भारत : सतीश भालेराव
नागपूर जिल्हा प्रतिनिधी
नागपूर : दिनांक ३१ मार्च

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती नागपूर जिल्हा च्या वतीने व्हेरायटी चौकातील महात्मा गांधी पुतळ्यासमोर भोंदूबाबा अशोक खरात च्या विरोधात निदर्शने करण्यात आली.
भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणाने सबंध महाराष्ट्राला हादरवून टाकले आहे. हे कृत्य केवळ गुन्हेगारी स्वरूपाचे नसून, ते एक राजकीय हितसंबंधातून घडून येणारे बुवाबाजीचे गंभीर प्रकरण आहे. बुवा, बाबा, मांत्रिक, तांत्रिक ईत्यादींचा शोध घेउन अंधश्रद्धा पसरवून भोळ्या भाबड्या स्त्रियांचे लैंगीक शोषण करणाऱ्या वाईट प्रवृत्तींना जादूटोणाविरोधी कायदा २०१३ अंतर्गत गुन्हे नोंदवून कायदेशीर कारवाई करण्यासाठी सरकारतर्फे कठोर पावले उचलण्यात यावी असे राज्य उपाध्यक्ष संजय शेंडे यांनी सांगितले. तर नागरिकांनी आपापल्या महिलांना भोंदू बुवा बाबाकडे पाठवण्यापासून थांबवावे तरच अशा अशोक खरात सारख्या भोंदू बाबांची दुकानदारी बंद होईल असे आव्हान जिल्हा अध्यक्ष जगजीत सिंग यांनी केले. जनतेने आपल्या समस्यांचे समाधान हे ज्योतिष्याद्वारे आणि कर्मकांडातून नाही, तर वैज्ञानिक दृष्टिकोन आणि विवेकाने करावे. अशोक खरात सारख्या भोंदुबुवांच्या नादी न लागता शोषक प्रवृत्तीस आळा बसवावा असे जनतेस आवाहन केले. याप्रसंगी राज्य उपाध्यक्ष संजय शेंडे, जिल्हा अध्यक्ष जगजीत सिंग, जिल्हा कार्याध्यक्ष गौरव आळणे, जिल्हा प्रधान सचिव विनोद उलीपवार, ज्येष्ठ कार्यकर्ते आनंद ढोबळे, सुधाताई बामनपल्लीवार, रंजना कोल्हे, मालती वराडे, संजय लाडे, शशिकांत रायपुरे, विलास भालेराव इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन जिल्हा कार्याध्यक्ष गौरव आळणे यांनी केली तर आभार विनोद उलीपवार यांनी मानले.




