Home Breaking News पुणे शहर प्रेसिडेंट भूषण पुरस्कार डॉ. प्रशांत टोणपे यांना प्रदान

पुणे शहर प्रेसिडेंट भूषण पुरस्कार डॉ. प्रशांत टोणपे यांना प्रदान

79

पुणे शहर प्रेसिडेंट भूषण पुरस्कार डॉ. प्रशांत टोणपे यांना प्रदान

सुवर्ण भारत : प्रिया मेश्राम
पुणे शहर प्रतिनिधी

पुणे : शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहराच्या वैद्यकीय क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटविणारे नामवंत अस्थिरोग तंज्ज्ञ (orthopedic surgeon) डॉ. प्रशांत टोणपे यांना नुकताच मानाच्या समजल्या जाणाऱ्या पुणे शहर प्रेसिडेंट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
त्यांच्या आजवरच्या निस्वार्थी सेवेची आणि वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाची दखल घेत हा सन्मान करण्यात आला आहे.
डाॅ.टोणपे यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल वैद्यकीय क्षेत्रातील अनेक मंडळींनी त्यांचे अभिनंदन करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व शुभकामना दिल्या आहेत.
आरोग्य उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविल्या बाबत त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती.