Home Breaking News सहज सुचलं महिला व्हाॅट्सअप गृपच्या मुख्य संयोजिका रंज्जू दिलीप मोडक यांचा आज...

सहज सुचलं महिला व्हाॅट्सअप गृपच्या मुख्य संयोजिका रंज्जू दिलीप मोडक यांचा आज वाढदिवस! विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळींनी दिल्या मोडक यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!

55
Oplus_131072

• सहज सुचलं महिला व्हाॅट्सअप गृपच्या मुख्य संयोजिका रंज्जू दिलीप मोडक यांचा आज वाढदिवस!

• विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळींनी दिल्या मोडक यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!

सुवर्ण भारत : किरण घाटे (विदर्भ विशेष प्रतिनिधी)

चंद्रपूर ——–  साहित्य,क्रीडा,संगीत, शैक्षणिक सामाजिक व कला क्षेत्रातील महिला व नवोदित तरुणींच्या कलागुणांना वाव देणा-या महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलंच्या मुख्य संयोजिका रंज्जू दिलीप मोडक यांचा आज गुरुवार दि.2 एप्रिलला वाढदिवस असून तो चंद्रपूर मुक्कामी त्यांच्या निवासस्थानी अनेक मान्यवर मंडळींच्या उपस्थितीत थाटात व उत्साहात संध्याकाळी साजरा होत आहे.
गेल्या चार वर्षांपासून त्या सहज सुचलंच्या मुख्य संयोजिका म्हणून यशस्वीपणे धूरा सांभाळीत आहेत.वेळोवेळी त्यांना मुख्य मार्गदर्शिका मायाताई कोसरे व जेष्ठ साहित्यिक अधिवक्ता मेघा धोटे यांचे मार्गदर्शन लाभले आहे.या शिवाय त्या योग नृत्य परिवार मध्ये महिला उपजिल्हा प्रभारी म्हणून आपली प्रामाणिकपणे जबाबदारी पार पाडत आहेत.
उच्च शिक्षित असणा-या रंज्जू मोडक यांनी मायाताई कोसरे व मेघा धोटे यांच्यासह सहज सुचलं गृपवरील अनेक नवोदित सदस्य व जेष्ठ सदस्यांचा अल्पकालावधीतच विश्वास संपादन केला आहे.
अतिशय शांत व प्रेमळ स्वभावाच्या असलेल्या मोडक ह्या मुळच्या चंद्रपूर जिल्ह्यातील शेगांव ह्या ग्रामीण भागातील रहिवाशी!
सध्या त्या चंद्रपूर शहरात आपल्या परिवारासह स्थायिक झालेल्या आहेत. महाविद्यालयीन जिवनापासून त्यांना समाजसेवेची आवड! आजही त्यांचा सामाजिक व धार्मिक कार्यक्रमात तेवढाच सहभाग असतोय ! समाजसेविका म्हणून त्यांचा चंद्रपूर जिल्ह्यातच सन्मान झाला नाही तर विदर्भातील काही भागात देखील त्यांचा थाटात सन्मान झाला आहे.

दोन वर्षांपूर्वी त्यांना लोकहितच्या वतीने मूल पत्रकार भवनात आयोजित केलेल्या एका दिमाखदार सोहळ्यात कर्तृत्ववान महिला सन्मान पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते तर मागिल वर्षी विदर्भातील वणी येथे एका सामाजिक संस्थेच्या वतीने त्यांचा सत्कार झाला व त्यांना त्यांच्या उल्लेखनीय कामगिरी बाबत महिला कर्तृत्ववान सन्मान पुरस्कार बहाल करण्यात आला होता.अनुक्रमे या पुरस्काराचे आयोजन मूल नगरीचे दत्तात्रय समर्थ अर्चना समर्थ व वणीच्या सुपरिचित कवयित्री रजनी पोयाम यांच्या संस्थेच्या वतीने करण्यात आले होते.
भद्रावती व्हॅर्चुअस मल्टीपर्पज सोसायटीच्या संस्थापक अध्यक्ष किरण साळवी यांच्या त्या जिवलग मैत्रीण असून रंज्जू मोडक यांनी सहज सुचलंच्या सहसंयोजिका नलिनी आडपवार यांच्याशी नेहमीच आपुलकी व सहानुभूतीचे संबंध जोपासले आहे.
स्वताचे विचार व अनुभव ह्यातून रंज्जू मोडक यांनी आपली चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
दरम्यान आज होवू घातलेल्या वाढदिवसाच्या निमित्ताने मूल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालिका चंदा कामडी,अमरावती वूमन न्यूज चॅनलच्या मुख्य संपादिका प्रिती साहू , मूलच्या नगरसेविका नलिनी आडपवार, समता बन्सोड, अर्चना चावरे, अर्चना समर्थ ,कवयित्री विद्या पिंजरकर, ठाण्याच्या कवयित्री कु.मंगल मिसाळ, नाशिकच्या चैताली आतराम, पुण्याच्या महिला पत्रकार स्नेहा मडावी, भद्रावती व्हॅर्चुअस मल्टीपर्पज सोसायटीच्या संस्थापक अध्यक्ष किरण साळवी, चंद्रपूरच्या आर्किटेक्ट शिवानी झाडे, मूलच्या पोर्णिमा किर्तीवार, पूनम मडावी, प्रांजू मखरे,अधिवक्ता हिमानी वाकुडकर, सावलीच्या कवयित्री शैला चिमड्यालवार, विजया भांगे, विजया तत्वादी,चंद्रपूरच्या गायिका रश्मी हिवरे, सारिका उराडे,कवयित्री वैजयंती गहुकर,अधिवक्ता सारिका टेंभरे, अनूश्री हिवरे , प्रियंका बेन्द्रे,नाट्य कलावंत टिना उराडे,सविता कोट्टी,राजूराच्या अंजली गुंडावार, संजीवनी धांडे,सरोज हिवरे , साधना धकाते,नवोदित कवयित्री पूजा पाटील, नागपूरच्या सुपरिचित कवयित्री प्रा. वैशाली राऊत, मुंबईच्या गझलकार प्रा.नंदा पाटील, रोहिणी पराडकर, सुरतच्या प्रा.राजश्री पाटील, अधिवक्ता प्रेरणा सहारे , कविता दिकोंडवार, सौंदर्या मांदाडे, ऐश्वर्या मांदाडे, अंजली इटनकर, प्रविणा वाघाडे, समाजसेविका प्रियंका चिताडे, उज्वला निमगडे , श्रद्धा परिमल , रजनी रणदिवे, वंदना बरडे आदिंनी त्यांना व्हाॅट्सअप संदेशांच्या माध्यमातून वाढदिवसाच्या शुभेच्छा व शुभकामना दिल्या आहेत.