समाजसेविका रंज्जू दिलीप मोडक यांचा चंद्रपूरात भावपूर्ण सत्कार
सुवर्ण भारत : किरण घाटे ( विशेष प्रतिनिधी)

चंद्रपूर : दि.३ एप्रिल समाजात अनेक विधायक उपक्रम राबविणणारे घटक,व्यक्ती व संस्था आहेत.चंद्रपूर तुकूम परिसरातील समाजसेविका रंज्जू दिलीप मोडक ह्या तुकूम परिसरात स्वच्छ भारत अभियान, योग व इत्तरही सामाजिक कार्य करीत असतात.
त्यांच्या या अतुलनीय व उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांचा स्थानिक विकलांग सेवा संस्थेतर्फे काल शाल, पुष्पगुच्छ व पुस्तक देऊन भावपूर्ण सत्कार करण्यात आला. भविष्यात ही आपण आपलं सामाजिक कार्य अधिक जोमाने करु अशी ग्वाही समाजसेविका व सहज सुचलंच्या मुख्य संयोजिका रंज्जू दिलीप मोडक यांनी यावेळी दिली.
त्यांनी या प्रसंगी संस्थेला नवीन व उपयुक्त अशी वस्त्रे उपलब्ध करुन दिल्याबद्दल संस्था विश्वस्त पूजा चहारे ,व श्रीराम पान्हेरकर ह्यांनी त्यांचे आभार मानले .या संस्थेला
समाजातील गरीब व गरजू लोकांसाठी जनतेने वस्त्रदान करावे असे आवाहन त्यांनी या प्रसंगी बोलताना केले.
शिवभोजन केंद्रात संपन्न झालेल्या ह्या कौटुंबिक सोहळ्याला राजश्री शिंदे, सीमा दुपारे, मुंबईच्या प्रख्यात चित्रकार नुपूर मोडक,देवराव कोंडेकर, खुशाल ठलाल आदिंची उपस्थिती लाभली होती.



