जनसुरक्षा विधेयक विरोधी कृती समिती द्वारा चंद्रपूरात जनपरिषद आयोजित
किरण घाटे : विशेष प्रतिनिधी 
चंद्रपूर शहरातील सुजान, सजग व संवेदनशील नागरिकांनी जन सुरक्षा विधेयक विरुद्ध एक कृती समिती स्थापन केली होती. याच कृती समितीच्या माध्यमातून अमेरिका इस्त्राइल चे इराण वरील साम्राज्यवादी युद्धाचा निषेध करण्यासाठी बॅ. राजाभाऊ खोब्रागडे पुतळा परिसर येथे एका ‘युद्ध विरोधी जनपरिषदे’चे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. कॉ.नामदेव कन्नाके यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या या जनपरिषदेमध्ये अनेक मान्यवरांनी आपली मते मांडली.
दुसऱ्या महायुद्धानंतर भांडवली साम्राज्यवाद संपला असे जरी जगाला भासवण्यात आले, तरी साम्राज्यवादाने नवे नवे रूप धारण करून अनेक देशांमध्ये छुप्या वा उघड पद्धतीने साम्राज्यवादी शोषण- सत्ता सुरू ठेवले.व जे देश या साम्राज्यवादी शोषणाला प्रतिसाद देत नाही, त्या देशांच्या नेत्यांना दहशतवादी, लोकशाही विरोधी ठरवून त्यांच्यावर हल्ले करणे हा अमेरिकेचा पायंडा झालेला आहे. दुसऱ्या पद्धतीने त्यांच्यावर टेरिफ लादुन त्यांना वेठीस धरल्या जाते. पश्चिम आशियात आपलं वर्चस्व व नियंत्रित ठेवण्यासाठी अमेरिकेने अनेक सैनिकी तळ निर्माण केली तिथल्याच छोट्या छोट्या देशांना हाताशी घेऊन साम्राज्यवाद वसाहतवाद गाजवत असते. त्या भागातील तेलावर वर्चस्व व नियंत्रण गाजवण्यासाठीच इराणवर अशा प्रकारचे अन्यायी व साम्राज्यवादी युद्ध लादण्यात आले. ज्याचा परिणाम साऱ्या जगाला भोगावे लागत आहे. यांच्या युद्धात शाळा, दवाखाने टार्गेट करून छोट्या लेकरांना सुद्धा मारण्यात आले. या अन्याय युद्धाचा आम्ही सर्व या जनपरिषदेद्वारे निषेध करत आहोत व आपल्या मागण्यांचे निवेदन राष्ट्रपतींना पाठवत आहोत. असे मान्यवरांनी यावेळी सांगितले. सुरेश नरनवरे, प्रकाश रेड्डी, संध्या एदलाबादकर, बाजीराव उंदीरवाडे, अरुण भेलके, सैजूद्दीन शेख, किशोर जामदार, प्रमोद गोडघाटे, सुब्रतो दत्त प्रा. अशोक निमगडे, बाबुराव जुमनाके यांनी आपली मते मांडली. सदरहु जनपरिषदेचे प्रास्ताविक कॉ. राजेश पिंजरकर, , सूत्रसंचालन, अंकुश वाघमारे यांनी तर उपस्थितीतांचे आभार अरुण धानोरकर यांनी मानले. दि. 1.04.2026 रोजी एका शिष्टमंडळाच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्या मार्फतीने राष्ट्रपती महोदयांना निवेदन सादर करण्यात आले.



