Home Breaking News #Ballarpur • भजनांच्या सुरांनी दुमदुमला बल्लारपूर : सांस्कृतिक सभागृहाचे उत्साहात उद्घाटन

#Ballarpur • भजनांच्या सुरांनी दुमदुमला बल्लारपूर : सांस्कृतिक सभागृहाचे उत्साहात उद्घाटन

123
Oplus_131072

#Ballarpur
• भजनांच्या सुरांनी दुमदुमला बल्लारपूर : सांस्कृतिक सभागृहाचे उत्साहात उद्घाटन

सुवर्ण भारत: शंकर महाकाली (संपादक)

बल्लारपूर : महाराणा प्रताप वार्डातील श्री मोठे हनुमान मंदिर परिसरात नव्याने उभारण्यात आलेल्या भव्य सांस्कृतिक सभागृहाचे उद्घाटन अत्यंत दिमाखात आणि भक्तिमय वातावरणात पार पडले. उद्घाटनानंतर रंगलेल्या भजन संमेलनाने संपूर्ण परिसर भक्तिरसाने भारावून गेला.

आमदार डॉ. सुधीर मुनगंटीवार यांच्या निधीतून साकारलेल्या या आधुनिक सभागृहाचे उद्घाटन माजी वनविभाग महामंडळ अध्यक्ष चंदनसिंग चंदेल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शहरातील ३२ भजन मंडळांचा सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. या उपक्रमामुळे भजन परंपरेला चालना मिळून कलाकारांना नवी ऊर्जा मिळणार आहे.

कार्यक्रमाला भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, शहराध्यक्ष ॲड. रणजय सिंह, बांधकाम विभागाचे वैभव जोशी, घनश्याम बुरडकर, देवा वाटकर, शुभम रहिक्वार यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन किशोर मोहूर्ले यांनी प्रभावीपणे पार पाडले. उद्घाटनानंतर आयोजित भजन संमेलनात विविध भजन मंडळांनी सादर केलेल्या सुरेल आणि भावस्पर्शी रचनांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. टाळ-मृदुंगाच्या गजरात आणि हरिनामाच्या गजरात वातावरण पूर्णपणे भक्तिमय झाले.

हा सोहळा केवळ धार्मिक कार्यक्रमापुरता मर्यादित न राहता सामाजिक एकात्मता, सांस्कृतिक जतन आणि परंपरेच्या संवर्धनाचा संदेश देणारा ठरला. नव्याने उभारलेले हे सभागृह भविष्यात धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांसाठी महत्त्वाचे केंद्र ठरणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.