• विविध मागण्यांसाठी चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर क्रांती सेना पदाधिका-यांचे आमरण उपोषण
• आजचा उपोषणाचा ३रा दिवस
सुवर्ण भारत:किरण घाटे
विविध मागण्यांची पूर्तता व्हावी यासाठी क्रांती

सेनाच्या पदाधिकाऱ्यांनी चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या तीन दिवसांपासून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.
आज दुपारी या प्रतिनिधीने या आंदोलन मंडपाला भेट दिली असता क्रांती सेनाचे संस्थापक अध्यक्ष अश्वजीत रुपचंद शहारे, क्रांतीसेना महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष भिमराव बंसोड व उपाध्यक्ष सद्दाम शेख आमरण उपोषणाला बसले असल्याचे दिसून आले.
सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयातील प्रलंबित अर्ज, शिष्यवृत्ती व तांत्रिक प्रश्नांची उत्तरे तात्काळ देवून कामगारांना न्याय द्यावा, दिवंगत परमेश्वर मेश्राम आत्महत्या प्रकरणी दोषी असणा-या अधिका-यांवर त्वरित निलंबनाची कारवाई करावी, कनिष्ठ अभियंता शुंभागी दोषी व राजकन्या ताकसांडे यांच्या संशयास्पद नियुक्त्या रद्द कराव्यात,सिएसटीपीएस मधील निविदा क्रमांक 3000062802 मधील अनियमितेची चौकशी चौकशी करून अभ्यागतांवरील जाचक निर्बंध हटवावे ह्या त्यांच्या प्रमुख मागण्यां असल्याचे क्रांती सेनाचे अध्यक्ष अश्वजीत शहारे यांनी आज या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.या वेळी आंदोलन मंडपात ज्योति रामलवार संगिता कैलाबाग सारीका चूरे,लिलावती रविदास, प्रणाली राऊत ,मुक्ती बाकची,सुशांत राऊत उपस्थित होते.
आमच्या मागण्यांची पूर्तता न झाल्यास या पेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा उपोषणकर्त्यांनी दिला आहे .






