Home Breaking News काँग्रेस जिल्हाध्यक्ष पदासाठी राजुरेड्डी यांचे नामांकन दाखल सुजन संघटन अभियानाला चंद्रपूरात...

काँग्रेस जिल्हाध्यक्ष पदासाठी राजुरेड्डी यांचे नामांकन दाखल सुजन संघटन अभियानाला चंद्रपूरात सुरुवात

212

काँग्रेस जिल्हाध्यक्ष पदासाठी राजुरेड्डी यांचे नामांकन दाखल

सुजन संघटन अभियानाला चंद्रपूरात सुरुवात

सुवर्ण भारत:पंकज रामटेके
सहाय्यक जिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर

चंद्रपूर : जिल्ह्यातील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्ष निवडीसाठी सुजन संघटन अभियानांतर्गत प्रक्रियेला अधिकृत सुरुवात झाली आहे. चंद्रपूर येथील एन. डी. हॉटेलमध्ये पक्षाच्या वतीने पाठविण्यात आलेले निरीक्षक संतोष कोलकोंडा आणि अभय छाजेड यांनी स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधत निवड प्रक्रियेची चाचपणी केली.

या प्रक्रियेदरम्यान विधानसभा व तालुकानिहाय कार्यकर्त्यांकडून अभिप्राय घेण्यात आला तसेच जिल्हाध्यक्ष व तालुका स्तरावरील ब्लॉक अध्यक्ष पदांसाठी इच्छुकांकडून नामांकन अर्ज स्वीकृत करण्यात आले.

याच पार्श्वभूमीवर घुग्घूस शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, घुग्घूस नगरपरिषदेचे उपाध्यक्ष व पाणीपुरवठा सभापती म्हणून कार्यरत असलेले, युवकांमध्ये लोकप्रिय आणि पक्षातील आक्रमक नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे राजुरेड्डी यांनी जिल्हाध्यक्ष पदासाठी आपले नामांकन दाखल केले.

या कार्यक्रमाला नगराध्यक्ष दिप्ती सोनटक्के, काँग्रेस नेते सैय्यद अनवर, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष रोशन दंतलवार, स्वच्छता सभापती नूरूल सिद्दीकी, बालकिशन कुळसंगे, शहजाद शेख, कुमार रुद्रारप, कपील गोगला, संजय कोवे यांसह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सुजन संघटन अभियानामुळे पक्ष संघटन मजबूत करण्यावर भर देण्यात येत असून, आगामी काळात जिल्हाध्यक्ष निवड प्रक्रियेला अधिक गती मिळणार असल्याचे संकेत यावेळी देण्यात आले.