चंदनसिंह चंदेल यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन नागरिकांना सहभागाचे आवाहन
सुवर्ण भारत : शंकर महाकाली (संपादक)
बल्लारपूर : वन विभाग महामंडळाचे माजी अध्यक्ष तथा भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते चंदनसिंह चंदेल यांच्या वाढदिवसानिमित्त आज, दिनांक ७ एप्रिल रोजी एकदंत लॉन येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराच्या माध्यमातून गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध करून देण्याचा उद्देश आहे.
बल्लारपूर भाजपाचे शहर अध्यक्ष ॲड. रणंजय सिंह यांनी माहिती देताना सांगितले की, या शिबिरात कार्यकर्ते तसेच नागरिकांनी स्वेच्छेने रक्तदान करावे. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून त्यामुळे अनेकांचे प्राण वाचू शकतात, असेही त्यांनी नमूद केले.
हे शिबिर सकाळी १०.०० ते सायंकाळी ४.०० या वेळेत पार पडणार आहे. अधिकाधिक नागरिकांनी या सामाजिक उपक्रमात सहभागी होऊन गरजूंपर्यंत रक्त पोहोचविण्यास हातभार लावावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
“रक्तदान – महादान” हा संदेश देत समाजातील प्रत्येक घटकाने या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.







