Home Breaking News घुग्घूस शहरातील प्रदूषणाची समस्या निकाली काढा :- नप सत्तापक्षाची मागणी जिल्हाधिकारी...

घुग्घूस शहरातील प्रदूषणाची समस्या निकाली काढा :- नप सत्तापक्षाची मागणी जिल्हाधिकारी वसुमना पंत यांना घुग्घूस शहरात येऊन प्रदूषण बघण्याची विनंती

154

घुग्घूस शहरातील प्रदूषणाची समस्या निकाली काढा :- नप सत्तापक्षाची मागणी

जिल्हाधिकारी वसुमना पंत यांना घुग्घूस शहरात येऊन प्रदूषण बघण्याची विनंती

घुग्घूस :- चंद्रपूर जिल्ह्याला पहिल्यांदाच महिला जिल्हाधिकारी मिळालेली आहेत आज नगरपरिषद घुग्घूस येथील सत्ता पक्षाचे नगराध्यक्ष व कमिटीने नव – नियुक्त जिल्हाधिकारी वसुमना पंत यांची भेट घेऊन शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

यानंतर घुग्घूस शहरातील प्रदूषण व अन्य समस्यावर विस्तृत चर्चा करण्यात आली.
चंद्रपूर जिल्ह्यातील प्रमुख औद्योगिक शहर म्हणून प्रसिद्ध असलेला घुग्घूस शहर हा देशातील सर्वात मोठा प्रदूषित शहर ठरलेला आहे.
येथील हवा ही विषारी झाली असून प्रत्येक श्वास ही शहरवासियांना जीवघेण्या आजरांच्या विळख्यात घेत असून मृत्यूच्या दारात लोटत आहे.
प्रदूषण नियंत्रणा करीता शासनाने प्रदूषण नियंत्रण मंडळाची निर्मिती केली आहे.
मात्र हा विभाग चिरीमिरी घेऊन कुंभकर्ण समान झोपेत गेलेला आहे.
प्रदूषण नियंत्रण विभागाला चाबकाचे फटके देऊन फुकटचे वेतन देणाऱ्यांना कामाला लावा शहर आजारी झाला आहे.
शहराला प्रदूषण मुक्त करण्यासाठी कठोर अंमलबजावणी करावी व घुग्घूस शहराला भेट देऊन येथील समस्या निकाली काढावी तसेच शहराला विकासापासून वंचित ठेवण्याचे कुटील षडयंत्र रचनाऱ्या मुख्याधिकारी निलेश रांजनकर यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी घुग्घूस नगरपरिषदे नगराध्यक्षा दिप्ती सुजित सोनटक्के, उपाध्यक्ष तथा पानी पुरवठा सभापती राजुरेड्डी, स्वच्छता व आरोग्य सभापती नूरूल सिद्दीकी,नगरसेवक दिलीप पिट्टलवार नगरसेविका अर्चना प्रशांत सारोकर, नगरसेविका आशा गणेश पानघाटे,नगरसेविका पल्लवी दिनेश घुले,नगरसेविका शुभांगी विक्की सारसर, काँग्रेस नेते सैय्यद अनवर, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष रोशन दंतलवार, रोहित डाकूर व अन्य पदाधिकारी उपस्थित होते