Home Breaking News सामाजिक कार्यकर्त्यांनी गोमातेला दिले जीवदान

सामाजिक कार्यकर्त्यांनी गोमातेला दिले जीवदान

134
Oplus_131072

सामाजिक कार्यकर्त्यांनी गोमातेला दिले जीवदान
वरोरा : रेल्वेस्टेशन जवळील बशीर ऑईल मिल जवळ एक खड्डा होता त्या खड्ड्यामध्ये गोमाता पडली व तिला बाहेर निघता येत नव्हते.त्यामुळे तिची जीवित हानी होण्याची शक्यता बळावली होती.त्याचवेळेस रेल्वे स्टेशन चौक ,मालवीय वॉर्ड व खांजी वॉर्ड येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी सामाजिक दायित्व जोपासून गोमातेला खड्ड्याचे वर काढून तिला जीवदान दिले.तिला मार लागल्यामुळे तिच्यावर उपचार करण्यासाठी कार्यकर्त्यांनी योगदान दिले.
कैलास चौगुले,मोहन कौयटे,नवाज पठाण,अजय लेदे,सूरज केशवानी आदी सामाजिक कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.