Home Breaking News विनापरवानगीने विद्युत पोलवर बॅनर महावितरण व नगरपरीषद प्रशासनाचे दुर्लक्ष* ...

विनापरवानगीने विद्युत पोलवर बॅनर महावितरण व नगरपरीषद प्रशासनाचे दुर्लक्ष* *बॅनर,पोस्टर, होल्डिंग मुळे शहराचे विद्रुपीकरण

78

• विनापरवानगीने विद्युत पोलवर बॅनर महावितरण व नगरपरीषद प्रशासनाचे दुर्लक्ष

• बॅनर,पोस्टर, होल्डिंग मुळे शहराचे विद्रुपीकरण

वरोरा ता. प्रतिनिधी
शहरात जाहिरातीद्वारे प्रसार व प्रचार केल्या जातो.यासाठी विविध खुल्या जागेवर बॅनर,पोस्टर लावले जाते.मात्र हे पोस्टर लावताना धोकादायक जागाही सोडल्या जात नाही.शहरातील विद्युत खांबावर अशा जाहिरातीचे पोस्टर,शुभेच्छा बॅनर लटकविलेले दिसून येतात.विद्युत खांबावर पोस्टर,बॅनर लावताना जिवावरही बेतू शकते.
वरोरा शहरातील सर्वत्र विद्युत पोलला नेहमीच कोणते ना कोणते बॅनर लावले जातात.यासाठी नगरपरिषद प्रशासनाची कुठलीही परवानगी घेतली जात नाही अशी माहिती आहे.विना परवानगीने बॅनर लावण्यात येणाऱ्या संबंधित नेते ,कार्यकर्ते यांच्यावर नगरपरिषद प्रशासनाने कारवाई करून गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे.
वरोरा शहरामध्ये जागोजागी अवैध बॅनर्स , होल्डींग दिसून येतात.गल्लीच्या कार्यकर्त्यापासून ते मुंबई, दिल्लीच्या नेत्यापर्यंतचे बॅनर वाटेल तेथे लावलेले असतात.मात्र त्यांच्यावर फारशी कारवाई होताना दिसत नाही.या पार्श्वभूमीवर मुळात बॅनर लाऊन शहराचे विद्रुपीकरण हा गुन्हा असून बेकायदेशीर आहे.पुन्हा लावलेले बॅनर फाडले गेल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
शहरातील पक्षीय नेते,कार्यकर्ते आपल्या पक्षाच्या गॉडफादर च्या आशीर्वादाने मनाला वाटेल तेथे नेत्यांच्या वाढदिवसाचे बॅनर लावतात.यासाठी त्यांनी विद्युत पोल सुद्धा सोडले नाही.विद्युत पोल ला जिवंत तारा असतात आणि बॅनर लावताना अचानक विजेचा धक्का बसून एखादी अप्रिय घटना घडल्यास याला कोण जबाबदार असेल असा प्रश्न निर्माण होतो आहे.यासाठी ज्या संबंधित व्यक्तीकडून विनापरवानगीने बॅनर लावल्या जातात अशा व्यक्तीवर वेळीच महावितरण व नगरपरिषद प्रशासन यांच्याकडून कारवाई होणे गरजेचे आहे.वारंवार विद्युत पोलला बॅनर लागत असताना नगरपरिषद प्रशासनाकडून एकदाही कारवाई होताना दिसून येत नाही.

 

विद्युत पोलला बॅनर किंवा पोस्टर लावण्याची नगरपरिषद प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची परवानगी दिली जात नाही.ज्यांनी विद्युत पोलला बॅनर लावले त्यांनीच ते काढायला पाहिजे होते.परंतु त्यांनी न काढल्यामुळे आमचे कर्मचारी पाठवून काढून घेतो.

विजय डुकरे लिपिक
न.प.वरोरा