घुग्घुस येथील आ.जोरगेवार जनसंपर्क कार्यालयात महामानव,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी

घुग्घुस : आमदार किशोरभाऊ जोरगेवार जनसंपर्क कार्यालयात दि.14 एप्रिल 2026 मंगळवार रोजी महामानव प.पु.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 वी जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कोटी, कोटी नमन करण्यात आले. तसेच सामुहिक बुद्ध वंदना घेण्यात आली.
चंद्रपूर मतदारसंघातील लोकप्रिय आ.किशोरभाऊ जोरगेवार यांच्या मार्गदर्शनातून भाजप शहर अध्यक्ष संजय तिवारी, महिला अध्यक्ष सौ. सुचिताताई लुटे गटनेता व नगरसेविका सौ. मीनाताई मोरपाका यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल मनोगत व्यक्त करीत म्हटले की,
क्रांतिसूर्य आणि प्रज्ञासूर्य: बाबासाहेब हे केवळ एका जातीचे नेते नव्हते, तर ते संपूर्ण राष्ट्राचे महामानव होते. त्यांनी मानसिक गुलामगिरीचे ओझे झुगारून देण्याची प्रेरणा दिली
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार: स्वतंत्र भारताची राज्यघटना लिहून त्यांनी देशातील प्रत्येक नागरिकाला – मग तो कोणत्याही जाती-धर्माचा असो – समान अधिकार दिले
शिक्षण आणि संघटन: त्यांनी ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ हा मूलमंत्र दिला. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, असे मानणाऱ्या बाबासाहेबांनी वंचितांच्या शिक्षणासाठी दारे उघडी केली
महिला आणि कामगारांचे कैवारी: हिंदू कोड बिल आणि कामगारांच्या हक्कांसाठी त्यांनी मोठे लढे दिले. त्यांना सामाजिक आणि आर्थिक समानता हवी होती
समतेचा मार्ग: दीक्षाभूमीवर लाखो अनुयायांसह बौद्ध धम्माचा स्वीकार करून त्यांनी शाश्वत समता आणि शांततेचा मार्ग दाखवला
आजच्या तरुण पिढीने बाबासाहेबांच्या विचारांचा अभ्यास करून, जातीभेदमुक्त आणि प्रगत भारत घडवण्यासाठी प्रयत्न करणे, हीच त्यांना खरी मानवंदना ठरेल.
याप्रसंगी भाजपा घुग्घुस शहराध्यक्ष संजय तिवारी, महिला शहराध्यक्षा सुचिता लुटे, गट नेता व नगरसेविका मिना मोरपाका,नगरसेवक गणेश पिंपळकर,स्वीकृत नगर सेवक निरीक्षण तांड्रा, माजी.सरपंच संतोष नुने,रामपाल वर्मा, साजन गोहणे, लखन हिकरे,मुन्ना लोडे,महेंद्र बाग,मदन रामटेके, गणेश शेंडे, विनोद भांडारकर,उषाताई आगदारी,
सुनीता पाटील,शितल रोशन आत्राम, श्रीमती अमिन बेगम,भारती सौदारी,शारदा पोन्नाला, अल्का भांडारकर, संजीदा सिद्दीकी, सुनंदा सौदरी,आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
