डॉ.बाबासाहेबांच्या जयंती निमित्त सत्कार समारंभ मसाला भात वाटप
वरोरा : भारतीय घटनेचे शिल्पकार ,विश्वरत्न, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथे अतुल वानखेडे मित्र परिवार तर्फे मान्यवरांचा सत्कार समारंभ व मसाला भात वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
हजारो वर्षांची गुलामीची पायातील जाखड तोडून मागास ओबीसी समाजाला मानाचे व सन्मानाचे स्थान घटनेच्या अधिकारातून बहाल केले.आणि सर्वांना समानतेचा हक्क दिला,अधिकार दिले.अशा महामानवाच्या जयंती निमित्त वरोरा शहरातील सर्व प्रतिष्ठित तथा सामाजिक कार्यकर्ते यांचे स्वागत सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रम प्रमुख उपस्थिती मध्ये.बाजार समितीचे सभापती डॉ.विजयराव देवतळे,नगराध्यक्षा अर्चनाताई ठाकरे, कृ उ.बा चे बांधकाम सभापती दत्ताभाऊ बोरेकर,प्रतिष्ठित व्यापारी मितेशजी शर्मा,उपविभागीय पोलीस अधिकारी बाकल, सर पोलीस निरीक्षक सोनटक्के, सर सहा.पोलीस निरीक्षक भस्मे, सर पोलीस विभागाचे गोपनीय विभाग प्रमुख वऱ्हाडे, माजी नगराध्यक्ष विलास टिपले, कृ उ.बा चे संचालक बाळू भोयर,न.प.चे गटनेते गजानन मेश्राम, नगरसेवक प्रदीप बूर्हान,सरकार ग्रुप चे कासिफ खान,काँग्रेस नेते प्रवीण काकडे,मनीष जयस्वाल,निलेश भालेराव या मान्यवरांचा सत्कार सामाजिक कार्यकर्ता अतुल वानखेडे मित्र परिवाराकडून करण्यात आला.याच कार्यक्रमाचे माध्यमातून सामाजिक बांधिलकी ,व सर्व धर्म समभाव मिरवणुकीतुन दिसून आली.







