डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आमदार करण देवतळे यांचे डॉ.बाबासाहेबाना अभिवादन
वरोरा : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समता, न्याय आणि बंधुत्वाच्या तत्वांवर आधारित समाजव्यवस्था उभी करण्यासाठी आयुष्यभर संघर्ष केला. त्यांच्या विचारांमुळे वंचित, शोषित आणि दुर्लक्षित घटकांना नवी दिशा व न्याय मिळाला.
या पवित्र दिनानिमित्त त्यांच्या कार्याचे स्मरण करत त्यांच्या विचारांना आत्मसात करून समाजहितासाठी कार्य करण्याचा संकल्प करण्यात आला. जयंतीनिमित्त आमदार करण देवतळे यांनी डॉ.बाबासाहेबांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन केले.
या प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या सहभागामुळे कार्यक्रम अधिक प्रेरणादायी व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
महामानवाच्या विचारांची ज्योत अशीच प्रज्वलित राहो, हीच विनम्र अभिवादनातून भावना आमदार करण देवतळे यांनी व्यक्त करण्यात आली.







