Home Breaking News चंद्रपूरमध्ये पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचे भव्य स्वागत

चंद्रपूरमध्ये पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचे भव्य स्वागत

132

चंद्रपूरमध्ये पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचे भव्य स्वागत

सुवर्ण भारत : किरण घाटे
विदर्भ विशेष प्रतिनिधी

चंद्रपूर : राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या चंद्रपूर दौऱ्याला गुरुवारी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा बल्हारपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांचे औपचारिक स्वागत करण्यात आले.

यावेळी भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी प्रियंका चिताडे यांनी मंत्री पंकजा मुंडे यांना पुष्पगुच्छ देऊन   त्यांचे स्वागत केले. कार्यक्रमाला भाजपचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मंत्री मुंडे यांच्या या दौऱ्यात जिल्ह्यातील पर्यावरणविषयक प्रश्न, वनसंवर्धन, प्रदूषण नियंत्रण तसेच विकासकामांचा आढावा घेण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूरमध्ये राजकीय व प्रशासकीय हालचालींना वेग आला आहे.

दरम्यान, या भेटीमुळे जिल्ह्यातील पर्यावरणीय प्रश्नांना चालना मिळेल, अशी अपेक्षा स्थानिकांकडून व्यक्त केली जात आहे.