Home Breaking News बल्लारपूरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाचे भव्य आयोजन

बल्लारपूरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाचे भव्य आयोजन

110

बल्लारपूरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाचे भव्य आयोजन

सुवर्ण भारत: वैभव मेश्राम , प्रतिनिधी

Oplus_131072

 

बल्लारपूर : दृष्टीहीन जनकल्याण बहुउद्देशीय संस्था, बल्लारपूर आणि आनंद शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या निमित्ताने महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायिका तथा प्रबोधनकार अश्विनी रोशन (चंद्रपूर) यांच्या संचाचा बुद्ध-भीम गीतांचा प्रबोधनात्मक संगीतमय कार्यक्रम शनिवार, दिनांक १८ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता बल्लारपूर येथील पाली बुद्ध विहार, बेघर जनकल्याण सोसायटीच्या भव्य प्रांगणात आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमाचे उद्घाटन नगराध्यक्ष, नगर परिषद बल्लारपूर डॉ. अलका वाढई यांच्या हस्ते होणार असून, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संगीतभाई फुलझले राहणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून ठाणेदार, बल्लारपूर विपीन इंगळे, वनपरिक्षेत्र अधिकार राजेंद्र घोरुडे, डॉ. अंकिता वाघमारे आणि राहुल आमटे उपस्थित राहणार आहेत.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आयोजक संस्थेचे अध्यक्ष दिलीप गेडाम , सचिव सतीश शेंडे , तसेच विशाल डुंबरे, संजय लोहकरे, शिवदास थूल, विजय माटे, चेतन मानकर, सुमेध शेंडे, शालीक डुंबारे यांनी नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

बुद्ध-भीम विचारांचा प्रसार करणारा हा कार्यक्रम सामाजिक प्रबोधनाचा एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार असून परिसरात उत्साहाचे वातावरण आहे.