Home Breaking News बल्लारपूर नवीन दहेली येथे फुले-आंबेडकर संयुक्त जयंती उत्साहात साजरी

बल्लारपूर नवीन दहेली येथे फुले-आंबेडकर संयुक्त जयंती उत्साहात साजरी

126
Oplus_131072

बल्लारपूर नवीन दहेली येथे फुले-आंबेडकर संयुक्त जयंती उत्साहात साजरी

सुवर्ण भारत : शंकर महाकाली (संपादक)p

बल्लारपूर : नवीन दहेली बल्लारपूर नवयुवक पंचशील बौद्ध मंडळ, नवीन दहेली लावारी यांच्या वतीने क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त आयोजित चार दिवसीय कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

११ ते १४ एप्रिल दरम्यान पार पडलेल्या या उपक्रमात गावातील नागरिक, युवक-युवती तसेच विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

कार्यक्रमाची सुरुवात ११ एप्रिल रोजी बुद्ध-भीम गीतांच्या प्रबोधनात्मक सादरीकरणाने झाली. १२ एप्रिल रोजी रांगोळी, वक्तृत्व आणि वेशभूषा स्पर्धांमधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळाला. १३ एप्रिल रोजी घेण्यात आलेल्या सामान्य ज्ञान स्पर्धेमुळे स्पर्धकांच्या बौद्धिक क्षमतेला चालना मिळाली. १४ एप्रिल रोजी आयोजित सामूहिक महाभोजनाने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

या कार्यक्रमाला अंकुश जिवणे, अमिश मेश्राम, सुमित गोरघाटे, विलास माऊलीकर, विकास निरंजने, युवराज निरंजने, संदीप निरंजने, लहू निरंजने, स्पंदन निरंजने, सारिपुत्र निरंजने, वैभव निमसरकर यांच्यासह ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहाने उपस्थिती लावली.

कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी मंडळाच्या सर्व सदस्यांनी नियोजनबद्ध प्रयत्न करत मोलाचे योगदान दिले.