Home Breaking News आंबेडकर जयंतीनिमित्त विदर्भ चौकात भव्य भोजनदान व शालेय साहित्य वाटप

आंबेडकर जयंतीनिमित्त विदर्भ चौकात भव्य भोजनदान व शालेय साहित्य वाटप

102

आंबेडकर जयंतीनिमित्त विदर्भ चौकात भव्य भोजनदान व शालेय साहित्य वाटप

सुवर्ण भारत : शंकर महाकाली

बल्लारपूर : डॉ. राजेंद्र प्रसाद वॉर्ड येथे दिनांक 16 एप्रिल रोजी विदर्भ चौक परिसरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त विदर्भ चौक मित्र परिवाराच्या वतीने भव्य सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात भव्य भोजनदान व विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाला नगरसेविका वैष्णवी जुमडे, सामाजिक कार्यकर्ते प्रदीप झामरे, ज्येष्ठ नागरिक प्रेमदास मुन, नागोराव हमणे, बंडू निंदेकर, तसेच सामाजिक कार्यकर्ता संध्यात चिकाटे, निशात नंदवंशी, आभा हुमणे, प्रज्ञा सोनेकर आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या वेळी मान्यवरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित करत त्यांचे विचार आचरणात आणण्याचे आवाहन केले. तसेच भगवान गौतम बुद्ध यांच्या समता, बंधुता, शांती व अहिंसा या तत्त्वांचा स्वीकार समाजाने करावा, असेही मत व्यक्त करण्यात आले.

विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” या संदेशाने प्रेरित होऊन मान्यवरांच्या हस्ते शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमादरम्यान भव्य भोजनदानाचा लाभ घेण्यासाठी शेकडो नागरिकांनी उपस्थिती दर्शवली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष आत्राम यांनी केले. त्यांनी विदर्भ चौक मित्र परिवाराच्या वतीने सामाजिक एकोपा, समता आणि बंधुता वाढविण्यासाठी असे उपक्रम सातत्याने राबवले जात असल्याचे सांगितले. सूत्रसंचालन आतिश हुमणे यांनी केले तर आभार प्रदर्शन धम्मदीप मुन यांनी मानले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राहुल निंदेकर, रमेश कवटलावार, सुजित सोनेकर, नितीन चल्लावार, सुनील गरड, उमेश सोनटक्के, सुमित कन्नोजवार, प्रफुल, राहुल चल्लावार, भटारकर, अमन, वांढरे, किंटू भैय्या तसेच परिसरातील महिला वर्गाने विशेष परिश्रम घेतले. तसेच प्रकाश बोनतलवार, यशवंत वासनिक, निलेश सोनटक्के, शेषराव तुमराम, आसिफ शेख, अविनाश तुकाराम, सईप शेख यांचेही योगदान लाभले.