Home Breaking News विसापुरात जेष्ठ नागरिकांकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन

विसापुरात जेष्ठ नागरिकांकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन

44

विसापुरात जेष्ठ नागरिकांकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन

सुवर्ण भारत: वैभव मेश्राम 
बल्लारपूर,प्रतिनिधी

विसापुर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त विसापुर येथे जेष्ठ नागरिकांतर्फे भावपूर्ण अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी गावातील प्रतिष्ठित नागरिक अशोक तुरणकार यांच्या निवासस्थानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. उपस्थित जेष्ठ नागरिकांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांच्या कार्याला कृतज्ञतापूर्वक अभिवादन केले.

या कार्यक्रमात प्रभाकरजी टोंगे, भीमराव पाझारे, अशोक तुरणकार, सुनील चौधरी, सुनील नाकाडे, सुनील पुणेकर, विजय गिरडकर, प्रणय तुरणकार आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रम शांत, साध्या व प्रेरणादायी वातावरणात पार पडला असून, डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचे स्मरण करून सामाजिक एकात्मतेचा संदेश देण्यात आला.