Home Breaking News #MLA Sudhir mungantiwar #chandrapur  • लघुलेखक पदभरती कायमस्वरूपी बंद करू नये...

#MLA Sudhir mungantiwar #chandrapur  • लघुलेखक पदभरती कायमस्वरूपी बंद करू नये — • प्रियंका चिताडे यांच्या नेतृत्वात विद्यार्थ्यांचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांना निवेदन सादर

136

#MLA Sudhir mungantiwar #ballarpur #Chandra 

• लघुलेखक पदभरती कायमस्वरूपी बंद करू नये —

प्रियंका चिताडे यांच्या नेतृत्वात विद्यार्थ्यांचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांना निवेदन सादर

सुवर्ण भारत: किरण घाटे विशेष प्रतिनिधी

चंद्रपूर : लघुलेखक पदभरती कायमस्वरूपी बंद करण्यात येऊ नये, या महत्त्वपूर्ण मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्या माजी युवती प्रमुख प्रियंका चिताडे यांच्या नेतृत्वात विद्यार्थ्यांनी एकत्र येत आज सोमवारी (दि. २० एप्रिल) लेखी निवेदन माजी वने व सांस्कृतिक मंत्री तथा बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे विद्यमान आमदार सुधीर मुनगंटीवार यांना सादर केले.

या निवेदनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी लघुलेखक पदभरती ही केवळ रोजगाराची संधी नसून अनेक युवक-युवतींसाठी करिअर घडवणारी महत्त्वाची प्रक्रिया असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे ही पदभरती कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर परिणाम करणारा ठरू शकतो, अशी भूमिका त्यांनी मांडली.

या वेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. सर्वांनी एकत्रितपणे आपल्या मागणीचा आवाज उठवत शासनाने या विषयाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी विनंती केली.

निवेदन स्वीकारल्यानंतर आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विद्यार्थ्यांचे म्हणात्ले शांतपणे ऐकून घेतले व या विषयावर सकारात्मक विचार केला जाईल, असे आश्वासन दिल्याचे प्रियंका चिताडे यांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाच्या या भेटीमुळे या प्रश्नाला नव्याने गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.