• प्रलंबित व रास्त मागण्यांसाठी –
आजपासून राज्य सरकारी कर्मचारी व शिक्षक बेमुदत संपावर!
• शासकीय कामाकाजावर विपरीत परिणाम!
चंद्रपूर किरण घाटे विशेष प्रतिनिधी

राज्य सरकारी कर्मचारी आणि शिक्षक यांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, चंद्रपूरच्या वतीने बेमुदत संपाला सुरुवात करण्यात आली.या संपामुळे शासकीय कामकाजावर परिणाम झाला आहे.संघटनेने आपल्या रास्त व प्रलंबित मागण्यांसाठी हा संप पुकारल्याचे संघटनेचे अध्यक्ष दिपक जेऊरकर यांनी या प्रतिनिधीशी चंद्रपूर मुक्कामी बोलताना सांगितले.
वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी आंदोलने करण्यात आली. परंतु मागण्या अजूनही प्रलंबित आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील “एकस्तर पदोन्नती व प्रोत्साहन भत्ता” पुर्ववत सुरू राहण्याकरीता शासनाने सुधारीत शासन निर्णय निर्गमित करण्यात यावा तसेच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवावे, लिपीकांच्या वेतन त्रृटी दूर करुन पदोन्नतीचे टप्पे कमी करावे, सुधारीत पेन्शन योजना दिनांक 1 मार्च 2024 पासून लागू करण्याची घोषणा झाली परंतु त्या संदर्भातील नियम व कार्यपध्दती निश्चित करा, चार कामगार संहीता रद्द करा, 8 व्या वेतन आयोगाच्या कार्यकक्षेचा आढावा घेणे तसेच 18 प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी ह्या बेमुदत संपाचे शस्त्र शासकीय कर्मचाऱ्यांनी हातात घेतले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करत संपाची सुरुवात करण्यात आली असून जिल्हा तसेच तालुका स्तरावरील कार्यालयातील शासकीय कर्मचारी संपावर आहेत. जिवती, कोरपना तसेच इतर दुर्गम भागातील कर्मचाऱ्यांचा चंद्रपूर येथील धरणे आंदोलनात प्रामुख्याने सहभाग आहे.
बेमुदत संपाला जिल्हा तथा तालुकास्तरावर कर्मचाऱ्यांनी 100 टक्के पाठींबा देत संपात प्रत्येक शासकीय कर्मचाऱ्यांनी आपला सहभाग नोंदविलेला दिसत असून संप 100 टक्के यशस्वी होत आहे. प्रलंबित मागण्या शासन जोपर्यंत मान्य करत नाही तोपर्यंत संप सुरु राहील असा ठाम निर्णय राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे अध्यक्ष दिपक जेऊरकर, राजु धांडे, श्रीकांत येवले, संतोष अतकरे, अविनाश बोरगमवार, अजय मेकलवार, राकेश शेंडे, सीमा पॉल, अतुल किनेकर, अमोल शिंदे, अजय चहारे, नारायण मोरे, दीपक हिवरे, मनोहर धाइत, महेश नाडमवार, चंद्रकांत कोतपल्लीवार, अमोल शिंदे, रजनी आनंदें, सतीश असरेट, लीना जाभुळकर, नम्रता सरोवरे, भाग्यश्री श्रीरामे, शैलेश जुमनाके, धनराज मस्के, प्रवीण अदेनकीवार, प्रकाश राऊत, अरुण घोरपडे यांनी घेतला आहे.


