• चंद्रपूर जिल्हाभूमि अभिलेख कार्यालयातील लिपीक श्रीमती हेमणे यांच्या बाबतीत मायाताई कोसरेंची जिल्हाधिका-यांकडे लेखी तक्रार!
• सौजन्यपूर्वक ” ती “महिला कर्मचारी वागत नसल्याचा तक्रारीत आरोप!
चंद्रपूर – विशेष प्रतिनिधी
चंद्रपूर जिल्हा भूमिअभिलेख कार्यालयातील महिला लिपिक श्रीमती ज्यूही हेमणे ह्या सर्वसामान्य जनता व शेतकरी वर्गांशी सौजन्यपूर्वक वागत नसल्याची लेखी तक्रार दि.20-2-26रोजी येथील जिल्हाधिकाऱ्यांकडे मायाताई कोसरे यांनी सादर केली आहे.
श्रीमती कोसरे ह्या मुल तालुक्यातील जानाळा येथील मुळ रहिवाशी असून सध्या त्यांचे वास्तव्य उपराजधानी नागपूर येथे आहे.
त्या स्वातंत्र संग्राम सैनिक डॉक्टर सखाराम कुचिनकर बहुउद्देशिय संस्था जानाळ्याच्या अध्यक्ष असून गेल्या काही वर्षांपासून त्यांचे शेतजमीन दुरुस्ती प्रकरण या कार्यालयात प्रलंबित आहेत.याच अनुषंगाने त्या चौकशी व माहिती जाणून घेण्यासाठी जात असताना आपणांस जिल्हाभूमि अभिलेख कार्यालयातील महिला लिपिक हेमणे यांच्याकडून सौजन्यपूर्वक वागणूक मिळत नसल्याचा आरोप त्यांनी चक्क जिल्हाधिकाऱ्यांना केलेल्या तक्रारीत केला आहे.
दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयाने या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता दि.26-226ला चंद्रपूर जिल्हा भूमिअभिलेखचे अधिक्षक यांना या प्रकरणात चौकशी करून चौकशी अहवाल मागितला.हे वृत्त लिहीपर्यत चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात संबंधित विभागाकडून अहवाल प्राप्त झाला नव्हता हे विशेष!
दरम्यान नागपूरच्या समाजसेविका मायाताई कोसरे यांनी या तक्रारीची एक प्रत थेट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर केली आहे.
कोसरे ह्या चंद्रपूर जिल्ह्याचे स्वातंत्र सैनिक डॉक्टर सखाराम कुचिनकर यांच्या कन्या असून आपणांस शेतजमीन दुरुस्ती प्रकरणात तातडीने न्याय मिळावा व चंद्रपूर जिल्हा भूमिअभिलेख कार्यालयातील महिला कर्मचारी हेमणे यांच्यावर कार्यवाही करावी अशी मागणी केली आहे.
चौकशीस व अहवाल पाठविण्यास विलंब काय?
मी केलेल्या तक्रारी बाबत चौकशीचा अहवाल पाठविण्यात व संबंधित लिपीकावर कार्यवाही करण्यास विलंब का? असा खडा सवाल देखील मायाताई कोसरे यांनी उपस्थित केला आहे.



