चंद्रपूर सैनिक शाळेत आंतर-गट फुटबॉल स्पर्धेचे थाटात उद्घाटन
सुवर्ण भारत: वैभव मेश्राम
प्रतिनिधी, बल्लारपूर
बल्लारपूर/विसापूर: सैनिक शाळा चंद्रपूर ये
थील आंतर-गट फुटबॉल स्पर्धा २०२६–२७ (ग्रुप-जी) चे शिस्त, उत्साह आणि क्रीडाभावनेच्या वातावरणात थाटात उद्घाटन करण्यात आले. या स्पर्धेत सैनिक स्कूल चंद्रपूर, सैनिक स्कूल सातारा, सैनिक स्कूल बीजापूर, सैनिक स्कूल बालाचडी, श्री ब्रह्मानंद विद्या मंदिर चपारडा, नेताजी सुभाषचंद्र बोस मिलिटरी अकॅडमी सिल्वासा, एस.के. इंटरनॅशनल स्कूल सांगली, प्रार्थना ग्लोबल स्कूल, आदर्श पब्लिक स्कूल सोलापूर आणि नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूल बिदर या दहा संघांचा सहभाग आहे. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कॅप्टन (इन) अश्विन अनुपदेव (प्राचार्य) होते. उपप्राचार्य लेफ्टनंट कर्नल रुबी दीक्षित आणि प्रशासकीय अधिकारी लेफ्टनंट कमांडर रजत जी उपस्थित होते. उद्घाटन सोहळ्याची सुरुवात स्कूल कॅप्टन कॅडेट ऋतुराज माने यांच्या नेतृत्वाखाली भव्य मार्च पास्टने झाली. त्यानंतर शपथविधी आणि मशाल रिले पार पडले. मशाल कॅडेट ऋतुराज माने यांनी वाहून नेली, तर स्पोर्ट्स व्हाइस कॅप्टन कॅडेट अंशू पाल यांनी यजमान संघाचे प्रतिनिधित्व केले. प्रमुख पाहुण्यांनी स्पर्धेचे उद्घाटन जाहीर केले. या सोहळ्यात एकता, शिस्त आणि प्रामाणिक क्रीडाभाव या मूल्यांचे प्रभावी प्रदर्शन दिसून आले






