Home Breaking News प्राची गौतम चहांदे इचे एमपीएससी ग्रृप-सी परीक्षेत निवड

प्राची गौतम चहांदे इचे एमपीएससी ग्रृप-सी परीक्षेत निवड

26

प्राची गौतम चहांदे इचे एमपीएससी ग्रृप-सी परीक्षेत निवड

चंद्रपूर : नुकताच एमपीएससीचा निकाल जाहीर झाला असून त्यात आमडी गांवातील प्राची गौतम चहांदे इचा कर सहाय्यक (Tax Assistant) म्हणून एमपीएससी महाराष्ट्र ग्रुप-सी सेवा मुख्य परीक्षा 2024 उत्तीर्ण केली आहे. ती एम.एस.सी. पूर्ण करून एमपीएससीची तैयारी सुरू केली होती. ती चंद्रपूर येथील शासकीय ग्रंथालयात पूर्णवेळ एमपीएससी व इतर परीक्षेची तैयारी करीत होती. तीचे वडील आमडी येथे शेतकरी आहे.
तीची मेहनत, दृढनिश्चय आणि आत्मविश्वास तरूणांसाठी प्रेरणादायी आहे. प्राची आपल्या यशाचे श्रेय आई वडीलांना आणि कुटुबीयाना देते. तिच्या यशाबद्दल नातेवाईक व मित्रांनी तिचे अभिनंदन केला.