Home Breaking News राज्य कर्मचारी संघटनेच्या बेमुदत संपाला उत्स्फूर्त प्रतिसाद; तिसऱ्या दिवशीही लढा कायम

राज्य कर्मचारी संघटनेच्या बेमुदत संपाला उत्स्फूर्त प्रतिसाद; तिसऱ्या दिवशीही लढा कायम

61

राज्य कर्मचारी संघटनेच्या बेमुदत संपाला उत्स्फूर्त प्रतिसाद; तिसऱ्या दिवशीही लढा कायम

सुवर्ण भारत : शंकर महाकाली

चंद्रपूर : शासन दरबारी प्रलंबित असलेल्या विवि

ध मागण्यांसाठी राज्य महसूल कर्मचारी संघटनेने पुकारलेल्या बेमुदत संपाला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. 21 एप्रिलपासून सुरू झालेल्या या संपाचा आज तिसरा दिवस असून, कर्मचाऱ्यांचा निर्धार अधिकच ठाम होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोठ्या संख्येने कर्मचारी एकत्र येत जोरदार घोषणाबाजी करत असल्याचे पाहायला मिळाले. “मागण्या मान्य करा”, “कर्मचाऱ्यांना न्याय द्या” अशा घोषणा देत आंदोलन अधिक तीव्र करण्यात आले आहे.

दरम्यान, राज्य कर्मचारी संघटनेचे नेते अजय मेकलवार यांनी शासनाला इशारा देताना स्पष्ट शब्दांत सांगितले की, “जोपर्यंत आमच्या मागण्यांची पूर्तता होत नाही, तोपर्यंत हा संप सुरूच राहील.”

या संपामुळे प्रशासनातील अनेक कामांवर परिणाम होत असून, नागरिकांनाही काही प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागत आहे. तरीही कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम असून, शासनाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.