Home Breaking News राजूरा येथे राज्य कर्मचारी संघटनेच्या बेमुदत संपाला 100 टक्के प्रतिसाद !

राजूरा येथे राज्य कर्मचारी संघटनेच्या बेमुदत संपाला 100 टक्के प्रतिसाद !

45

राजूरा येथे राज्य कर्मचारी संघटनेच्या बेमुदत संपाला 100 टक्के प्रतिसाद !

चंद्रपूर  :  किरण घाटे

शासन दरबारी खित पडलेल्या रास्त व प्रलंबित मागण्यांसाठी राज्य महसूल कर्मचारी संघटनेंनी दि.21एप्रिल पासून पुकारलेल्या बेमुदत संपाला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला असल्याचा दावा राजूरा येथील तहसिल कार्यालयाचे सहायक महसूल अधिकारी गजानन उपरे यांनी गुरुवारी सकाळी या प्रतिनिधीसोबत बोलताना केला.

आजच्या बेमदत संपाचा तीसरा दिवस असून शासनाने या संपाची अद्याप दखल घेतली नाही.विशेष म्हणजे या संपात चंद्रपूर जिल्ह्यातील महसूल कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले असल्याचे वृत्त आहे.

दरम्यान जिल्हास्तरावर देखील या संपाला कर्मचारी वर्गांचा उत्स्फूर्तंपूर्वक प्रतिसाद मिळत आहे.

राजूरा येथील बेमुदत संपात प्रामुख्याने सहायक महसूल अधिकारी गजानन उपरे, किशोर भोगेकर, अन्सारी, राजेश कावळे, उमेश मेश्राम, श्रीनिवास अकनुरवार, महसूल सहायक प्रकाश चेन्नुरवार, सूरज चिमुरकर, मनिषा शिखरे, अर्चना गोहोणे, तोषा रामटेके, ललिता मारकड, शिपाई गुलाब लोहबळे, वर्षा ऊरवेट, किरण आलाम,आदिं सहभागी झाले आहेत.