Home Breaking News “चंद्रपूरचा राजा” जटपूरा युवक गणेश मंडळाचा सत्कार व स्नेहमिलन सोहळा उत्साहात

“चंद्रपूरचा राजा” जटपूरा युवक गणेश मंडळाचा सत्कार व स्नेहमिलन सोहळा उत्साहात

128

“चंद्रपूरचा राजा” जटपूरा युवक गणेश मंडळाचा सत्कार व स्नेहमिलन सोहळा उत्साहात

सुवर्ण भारत : शंकर महाकाली (संपादक)

चंद्रपूर, दि. २२ एप्रिल २०२६ — “चंद्रपूरचा राजा”

Oplus_131072

जटपूरा युवक गणेश मंडळाच्या वतीने  पृथ्वी दिना चे औचित्य साधत आयोजित करण्यात आलेला सत्कार समारंभ व स्नेहमिलन कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला. जटपुरा युवक व्यायाम शाळा येथे झालेल्या या सोहळ्याला नागरिक, पदाधिकारी आणि मान्यवरांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भागवताचार्य श्री मनीषभाई महाराज यांची उपस्थिती लाभली. आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून त्यांनी सामाजिक ऐक्य, पर्यावरण संवर्धन आणि युवकांच्या सकारात्मक सहभागाचे महत्त्व अधोरेखित केले.

यावेळी समाजकार्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल नगरसेवक रवि लोणकर व आकाश साखरकर यांचा सन्मानचिन्ह व शाल देऊन गौरव करण्यात आला. तसेच शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट यश संपादन करणाऱ्या कु. थोरवी बेले (९१%) व कु. वंशिका महल्ले (९५%) या विद्यार्थिनींचा सत्कार करून त्यांच्या गुणवत्तेचे कौतुक करण्यात आले.

अध्यक्ष दीपक बेले यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात समाजातील गुणी व कर्तृत्ववान व्यक्तींना प्रोत्साहन देण्याची मंडळाची परंपरा कायम ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.

कार्यक्रमास मंडळाचे सचिव महेश बेले, कोषाध्यक्ष बाळकृष्ण वैरागडे, उपाध्यक्ष प्रवेश बुटले, उत्सव समिती अध्यक्ष कमलेश वैरागडे तसेच अमित बानकर, गणेश खणके, जगदीश आगडे, तुषार लांजेवार, सुरेश वैरागडे, प्रशांत येणुरकर आदी पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शैलेश जुमडे यांनी प्रभावीपणे केले.

सामाजिक बांधिलकी, गुणवंतांचा गौरव आणि आपुलकीचे वातावरण यांचा संगम असलेला हा स्नेहमिलन सोहळा उपस्थितांच्या स्मरणात राहील, असा ठसा उमटवून गेला.