Home Breaking News #Ballarpur • महाबोधी संघटनेकडून नगराअध्यक्क्षा अल्का वाढई यांचा सत्कार; कन्नमवार वॉर्डातील समस्यांवर...

#Ballarpur • महाबोधी संघटनेकडून नगराअध्यक्क्षा अल्का वाढई यांचा सत्कार; कन्नमवार वॉर्डातील समस्यांवर निवेदन

164

#Ballarpur
• महाबोधी संघटनेकडून नगराअध्यक्क्षा अल्का वाढई यांचा सत्कार; कन्नमवार वॉर्डातील समस्यांवर निवेदन

सुवर्ण भारत : वैभव मेश्राम
प्रतिनिधी, बल्लारपूर

बल्लारपूर : महाबोधी ज्येष्ठ नागरिक संघ, बल्लारपूर यांच्या वतीने नगर परिषदेच्या अध्यक्षा अल्का वाढई यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. याच प्रसंगी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कन्नमवार वॉर्डातील विविध समस्यांबाबत निवेदन सादर केले.

डॉ. राठी यांच्या घराजवळील मोठ्या बागेत दररोज सकाळी नागरिक व्यायामासाठी मोठ्या संख्येने येतात. मात्र, या बागेत स्वच्छतेचा अभाव असून काही ठिकाणी पाणी साचल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. व्यायामासाठी वापरल्या जाणाऱ्या जागेची दुरवस्था झाल्याने तातडीने स्वच्छता व सुशोभीकरण करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली.

या संदर्भात संबंधित विभागाला आवश्यक सूचना देऊन लवकरात लवकर काम पूर्ण करण्याचे आश्वासन अध्यक्षा वाढई यांनी दिले.

यावेळी परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेल्या संविधानाच्या उद्देशपत्रिकेचे वाचन करून त्याच्या प्रती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना वितरित करण्यात आल्या.

कार्यक्रमाला महाबोधी संघटनेचे कार्यकर्ते पृथ्वीराज वाळके, पौर्णिमा टिपले, प्रकृती पाटील, अशोक भावे, नथ्थु रामटेके, किशोर नगराळे, प्रभूदास देवगळे आदी उपस्थित होते.