एकोना खाणीतून कोळशाची तर पांझुर्णी क्रशर वरून दगडाची दिवस रात्र ताडपत्री शिवाय ट्रकमधून ओव्हरलोड वाहतूक होत आहे
काही दिवसांपूर्वी आरटीओ ला माहिती देऊनही या समस्येकडे दुर्लक्ष केल्याचे चित्र दिसत आहे
वरोरा. शहरापासून जवळच एकोना कोळसा खाणीतून कोळसा आणि पांझुर्णी क्रशर खाणीतून दगड घेऊन नांदोरीकडे जाणारे ओव्हरलोड ट्रक ताडपत्रीशिवाय जात आहेत. या जाणाऱ्या ट्रकमधून कोळशाचे ढेकळे वारंवार रोडवर खाली पडतात, ज्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. मात्र संबंधित विभाग याकडे दुर्लक्ष करत आहे. वरोरा येथील एका सामाजिक कार्यकर्त्याने अंदाजे 15 दिवसा पूर्वी समस्या कडे लक्ष वेधण्यासाठी चंद्रपूर येथील मुख्य आरटीओ लोही यांची कार्यालयात भेट घेतली होती परंतु या समस्याकडे लक्ष दिल्याचे चित्र दिसत नाही.
एकोना खाण शहरापासून अगदी जवळ आहे. येथील वाहतूक करणारे अनेक ट्रक फिटनेस चाचणीत उत्तीर्ण होऊ शकनार नाहीत असे चित्र दिसत आहे. परंतु त्यांच्यावर देखरेख ठेवण्यासाठी संबंधित विभागातून कोणीही नसल्यामुळे, सर्व काही सुरूच आहे. काही दिवसांपूर्वी, एका सामाजिक कार्यकर्त्याने थेट आरटीओशी संपर्क साधून त्यांना समस्यांची माहिती दिली, ज्यात इंडिकेटर आणि नंबर प्लेट नसलेल्या, तसेच ताडपत्री नसलेल्या ओव्हरलोड कोळसा वाहून नेणाऱ्या वाहनांचा समावेश होता. तथापि, जवळपास १५ दिवस उलटूनही आरटीओ विभागाने याकडे पुरेसे लक्ष दिल्याचे दिसत नाही. आजही फिटनेस रहित अनेक वाहने भरधाव वेगाने धावत आहेत आणि रस्त्यावर कोळशाचे गडे सांडत आहेत.
एकोना कोळसा खाणीतील कोळसा वरोरा माढेली रस्त्यामार्गे निर्धारित ठिकाणी नेला जातो. मालवाहू ट्रक पूर्णपणे ताडपत्रीने झाकलेला असणे नियम आहे. तथापि, ओव्हरलोड कोळसा लवकर पोहोचवण्यासाठी, ट्रक चालक कोळसा तसेच पांझुर्णी परिसरातील एका क्रशर मधून ट्रक मध्ये भरलेले दगड ताडपत्री न झाकताच नंदुरीच्या दिशेने दिवस रात्र नेले जातात. रस्त्यावरील खड्ड्यांमधून जाताना, ओव्हरलोड ट्रकमधून कोळशाचे गडे खाली पडत राहतात. हा रस्त्याचे सध्या बांधकाम चालू असून वाहनाच्या वेगाने धूळ उडून समोरील वाहन दिसेनासे होतात त्यामुळे अपघाताचा धोका जास्त निर्माण होत आहे हा रस्ता निवासी भागातून जातो आणि जर दुचाकीस्वार ट्रकजवळून जात असताना कोळशाचा गडा त्याच्यावर पडला, तर मोठा अपघात होऊ शकतो.
जुन्या आणि अयोग्य ट्रकमधून कोळशाची वाहतूक
कोळसा खाणीतून कोळसा वरोरा वीज प्रकल्प आणि इतर बाहेरील ठिकाणी नेला जातो. या मार्गावर आरटीओ किंवा वाहतूक पोलिसांचे कर्मचारी ठेवण्याची मागणी जनता करत आहे. येथे कोळसा वाहून नेणाऱ्या अनेक ट्रकमध्ये इंडिकेटर नसतात, ते सुस्थितीत दिसत नाहीत आणि त्यांच्या नंबर प्लेट्ससुद्धा व्यवस्थित लावलेल्या दिसेनास्या असतात किंवा नसतात. या समस्या मुळे अनेक अपघात झाले असून त्यात अनेकांचा जीव गेला आहे. भविष्यात या समस्येकडे आरटीओचे दुर्लक्ष असल्यास अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. भविष्यात अयोग्य ट्रकमुळे होणाऱ्या अपघातांसाठी आरटीओला जबाबदार धरले जाण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे, या मार्गाने ये-जा करणारे सर्वसामान्य नागरिक यांची मागणी आहे की संबंधित विभागांनी दोषी वाहनावर कारवाई करावी.
आमच्या आरटीओ विभागाचे तपासणी पथक सर्वत्र जाऊन वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करत आहे. आम्ही वरोरा-माढेली रस्त्यावरील वाहतुकीकडेही लक्ष देऊन नियम मोडणाऱ्या वाहनांवर दंडात्मक तसेच नियमात बसणारी कारवाई करू.
पायघन आरटीओ, चंद्रपूर
