Home Breaking News • बुकिंग करूनही ८ दिवस सिलिंडर नाही; जाब विचारणाऱ्या ग्राहकाला उद्धट वागणूक...

• बुकिंग करूनही ८ दिवस सिलिंडर नाही; जाब विचारणाऱ्या ग्राहकाला उद्धट वागणूक • वरोऱ्यात ‘स्नेहा गॅस एजन्सी’कडून ग्राहकांची मोठी पिळवणूक  मुजोर मालकाविरोधात तहसीलदारांकडे तक्रार • ​आगाऊ रक्कमेची मागणी ; सिलिंडर परत नेल्याचा प्रकार

7

• बुकिंग करूनही ८ दिवस सिलिंडर नाही; जाब विचारणाऱ्या ग्राहकाला उद्धट वागणूक

• वरोऱ्यात ‘स्नेहा गॅस एजन्सी’कडून ग्राहकांची मोठी पिळवणूक  मुजोर मालकाविरोधात तहसीलदारांकडे तक्रार

• ​आगाऊ रक्कमेची मागणी ; सिलिंडर परत

Oplus_131072

नेल्याचा प्रकार

सुवर्ण भारत:खेमचंद नेरकर
तालुका प्रतिनिधी, वरोरा

​वरोरा : शहरातील ‘स्नेहा गॅस एजन्सी’कडून घरगुती गॅस ग्राहकांची मोठ्या प्रमाणावर पिळवणूक सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गॅस एजन्सीचे मालक गुंडावार आणि कर्मचाऱ्यांच्या मुजोर व उद्धट वागणुकीमुळे ग्राहक कमालीचे त्रस्त झाले असून, वारंवार वादाच्या भोवऱ्यात सापडणाऱ्या या वादग्रस्त स्नेहा गॅस एजन्सीचा परवाना तातडीने रद्द करण्यात यावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
​ मिळालेल्या माहितीनुसार वरोरा शहरातील रहिवासी असलेले ग्राहक सोनारकर यांनी २ जून २०२६ रोजी घरगुती गॅस सिलिंडरसाठी बुकिंग केले होते. बुकिंग केल्यानंतर त्यांच्या मोबाईलवर रीतसर ओटीपी आला आणि बिल जनरेट झाल्याचा मेसेजही प्राप्त झाला. नेहमीप्रमाणे सिलिंडर घरपोच मिळेल या आशेवर सोनारकर कुटुंब होते. मात्र, तब्बल ८ दिवस उलटूनही सिलिंडर घरी पोहोचले नाही. त्यामुळे सोनारकर यांनी थेट स्नेहा गॅस एजन्सी गाठून विचारणा केली असता, तुमची बुकिंग रद्द झाली आहे असे धक्कादायक उत्तर त्यांना देण्यात आले. यामुळे ग्राहक सोनारकर संतप्त झाले. त्यांनी यावर अधिक विचारणा केली असता, गॅस एजन्सीचे मालक गुंडावार आणि तिथल्या कर्मचाऱ्यांनी सोनारकर यांच्याशी अत्यंत उद्धट आणि अरेरावीची भाषा वापरत हुज्जत घातली. एजन्सीच्या या मनमानी कारभाराला कंटाळून सोनारकर यांनी थेट वरोरा तहसील कार्यालय गाठले आणि तहसीलदार यांच्याकडे या प्रकरणी लेखी तक्रार दाखल केली.
तहसीलदारांकडे तक्रार होताच त्यांनी तातडीने सोनारकर यांच्या घरी सिलिंडर पाठवले. मात्र, सिलिंडर दारात पोहोचल्यानंतर तिथल्या कर्मचाऱ्यांनी सोनारकर यांच्याकडे मूळ बिलाव्यतिरिक्त आगाऊ पैशांची मागणी केली. सोनारकर यांनी ही बेकायदेशीर वसुली देण्यास स्पष्ट नकार दिला. याचा राग आल्याने गॅस एजन्सी मालकाच्या सांगण्यावरून आलेल्या कर्मचाऱ्यांनी दिलेले सिलिंडर थेट घरून परत नेण्याची नाहक मुजोरी दाखवली.
​ हा सर्व प्रकार समोर आल्यानंतर अखेर पुरवठा निरीक्षक गवई यांनी गॅस एजन्सी मालकांशी संपर्क साधून कडक शब्दांत सुनावले. पुरवठा निरीक्षकांच्या मध्यस्थीनंतर दुसऱ्या दिवशी सोनारकर यांच्या घरी सिलिंडर पाठवण्यात आले आणि बिला नुसार पैसे पण घेतले. मात्र गॅस एजन्सीच्या या छळा मुळे आणि विलंबा मुळे सोनारकर यांचे तब्बल एक महिन्याचे सिलिंडरचे नुकसान झाले आहे. स्नेहा गॅस एजन्सीच्या या सातत्यपूर्ण मनमानी आणि ग्राहकांना वेठीस धरण्याच्या वृत्तीमुळे वरोरा शहरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, प्रशासनाने या मुजोर एजन्सीवर कठोर कारवाई करत तिचा परवाना तात्काळ रद्द करावा, अशी मागणी आता नागरिक करत आहेत.