प्रीती साहु यांची भेट अन् रंगलेला संवाद!
सुवर्ण भारत : किरण घाटे( विदर्भ विशेष प्रतिनिधी)
येत्या 5 जूलैला वुमेन्स न्यूज चॅनलचा विशेष कार्यक्रम चंद्रपूर मुक्कामी आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने नुकत्याच त्या चॅनलच्या मुख्य संपादिका प्रीती साहु (अमरावती)ह्या चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येवून गेल्या त्यांनी याच दौऱ्यात अनेकांशी संवाद साधला.
सहज सुचलं परिवार
साठी त्यांनी वेळात वेळ काढून आपला अमुल्य वेळ दिला.साहु यांचे सहज सुचलं विषयी प्रेम व आपुलकी या वेळी प्रत्यक्ष दिसून आली.सहज सुचलं काव्यकुंजच्या मुख्य संयोजिका विद्या पिंजरकर यांच्या निवासस्थानी एक परिसंवाद रंगला व मुलाखतीही झाल्या या प्रसंगी सहज सुचलंच्या वतीने अधिवक्ता मेघा धोटे यांनी त्यांचे
पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
कार्यक्रमात शोभा आणली ती
ख-या अर्थाने सहज सुचलंच्या नवोदित कवयित्री प्रियंका बेन्द्रे व नाट्य कलावंत टीना उराडे यांनी! त्यांनी प्रीती साहु यांना आपला नेहमीच्या खास शैलीत परिचय करून दिला.
मेघा धोटे यांनी आपल्या मुलाखतीतून निव्वळ सहज सुचलंच्या उल्लेखनीय कार्याचा वाजागाजा न करता आपल्या लोकप्रिय चॅनलच्या माध्यमातून समाजातील महिलांना न्याय मिळावा अशी रास्त अपेक्षा व्यक्ती केली.तर चंद्रपूरच्या समाजसेविका सुवर्णा लोखंडे यांनी पुरस्कार देतांना ख-या अर्थाने कर्तृत्ववान चेह-यांची ओळख करूनच त्यांचा सन्मान करावा अशी आपल्या बोलण्यातून अपेक्षा व्यक्त केली.
विद्या पिंजरकर व शैला चिमड्यालवार यांनी आपला साहित्य क्षेत्रातील प्रवास कसा सुरु झाला हे सविस्तरपणे सांगितले.हे सर्व ऐकत असताना प्रीती साहु यांच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद झळकत होता . या वेळी त्या अक्षरशः भारावून गेल्या होत्या.
ग्रामीण भागात वास्तव्य असणाऱ्या शिक्षिका वंदना उपगन्लावार यांनी आपल्या मधुर व गोड आवाजात गित गाऊन कार्यक्रमात वेगळीच रंगत भरली.सेवानिवृत्त नायब तहसिलदार साधना धकाते यांनी सहज सुचलंच्या कामाविषयी आपलं मनोगत व्यक्त करताना त्यांनी नेमका सहज सुचलंच्या मुख्य संयोजिका रंजू दिलीप मोडके यांच्या नावाचा उल्लेख केला.एक कर्तृत्ववान संयोजिका म्हणून त्यांच्या नावाचा या वेळी उल्लेख केला.
किरण घाटे यांनी प्रीती साहु यांचे आगमन होताच त्यांचे स्वागत केले.
आपल्या सविस्तर सांगण्यातून त्यांनी मुंबईच्या पुरस्कार प्राप्त सहज सुचलं कलाकुंजच्या नुपूर मोडक, प्रख्यात रांगोळी आर्टिस्ट साक्षी वाडगूरे,(किनवट) जागतिक स्तरावर ज्यांचा सन्मान झाला अश्या पुनम वासाडे(वणी)लोकप्रिय नाट्य कलावंत टीना उराडे(चंद्रपूर)आर्किटेक्ट शिवानी झाडे (चंद्रपूर)यांच्या नावांचा प्रामुख्याने उल्लेख केला.एवढेच नाही तर त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीचे गोडवे देखील गायले.
सहज सुचलंच्या प्रसिद्धी प्रमुख प्रविणा वाघाडे व कविता दिकोंडवार या वेळी उपस्थित नव्हत्या .पण त्यांच्या कामाविषयी त्यांनी त्यांना संक्षिप्त माहिती दिली.
येत्या ५ तारखेच्या कार्यक्रमाला मायाताई कोसरे अधिवक्ता मेघा धोटे रंजू दिलीप मोडके व नलिनी आडपवार यांच्यासह सहज सुचलंच्या सर्व सदस्यां उपस्थित राहणार असल्याचे किरण घाटे यांनी या वेळी आवर्जून सांगितले.







