Home Breaking News इंजिनिअरिंग सीईटीमध्ये वरोऱ्याचा मोहक चवले राज्यात अव्वल; १०० पर्सेंटाइलसह घवघवीत यश

इंजिनिअरिंग सीईटीमध्ये वरोऱ्याचा मोहक चवले राज्यात अव्वल; १०० पर्सेंटाइलसह घवघवीत यश

21
Oplus_131072

इंजिनिअरिंग सीईटीमध्ये वरोऱ्याचा मोहक चवले राज्यात अव्वल; १०० पर्सेंटाइलसह घवघवीत यश

वरोरा : महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष (CET Cell) मार्फत घेण्यात आलेल्या इंजिनिअरिंग, कृषी व फार्मसी अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, वरोरा येथील एक्सलंट अकॅडमीचा विद्यार्थी मोहक संदीप चवले याने १०० पर्सेंटाइल गुण मिळवत राज्यात अव्वल स्थान पटकावले आहे.
यावर्षी राज्यभरातून केवळ १२ विद्यार्थ्यांनी १०० पर्सेंटाइल मिळवण्याची किमया साधली असून, त्यामध्ये मोहक चवलेचा समावेश आहे. त्याच्या या अभूतपूर्व यशामुळे वरोरा शहरासह संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
एक्सलंट अकॅडमीच्या इतर विद्यार्थ्यांनीही उल्लेखनीय यश संपादन केले आहे. निशांत संगीत नवघरे याने ९९.९४, मनन संगीत मोदी याने ९९.१९, तर नील राजेश माथनकर याने ९८.८५ पर्सेंटाइल गुण मिळवले आहेत.
तसेच सायली धनराज रेवतकर (९७.८५), ईशांत रमाकांत ठावरे (९७.८२), कृष्णा रवींद्र देसाई (९७.४४), क्रितिका दिवाकर मोडक (९६.५५) आणि दिपाली पुरुषोत्तम बावनकर (९५.३३) यांनीही उत्कृष्ट यश मिळवत अकॅडमीच्या शैक्षणिक गुणवत्तेची छाप पाडली आहे.
नर्सिंग प्रवेश परीक्षेतही अकॅडमीच्या विद्यार्थिनींनी चमकदार कामगिरी केली. आस्था जगन्नाथ रंदई हिने ९६.७८ तर आराधना रामानंद प्रजापती हिने ९५.९८ पर्सेंटाइल मिळवत आपला प्रवेश निश्चित केला आहे.
विद्यार्थ्यांच्या या अभूतपूर्व यशाबद्दल एक्सलंट अकॅडमीचे संस्थापक प्रा. अभय टोंगे, तसेच सर्व प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्राचे आमदार करण देवताळे यांच्या हस्ते मोहक चवले याचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. त्यांच्या या यशामुळे वरोरा शहराच्या शैक्षणिक क्षेत्रात मानाचा तुरा रोवला गेला आहे.