Home Breaking News प्रमोद घोरघाटे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद शाळेला महापुरुषांच्या प्रतिमांचे वाटप

प्रमोद घोरघाटे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद शाळेला महापुरुषांच्या प्रतिमांचे वाटप

36

प्रमोद घोरघाटे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद शाळेला महापुरुषांच्या प्रतिमांचे वाटप

सुवर्ण भारत: वैभव मेश्राम 
प्रतिनिधी, बल्लारपूर

बल्लारपूर : नवीन दहेली येथील सामाजिक कार्यकर्ते प्रमोद घोरघाटे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, नवीन दहेली येथे विद्यार्थ्यांना महापुरुषांच्या प्रतिमांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये महापुरुषांच्या विचारांचा आदर, सामाजिक जाणीव आणि प्रेरणा निर्माण करणे हा होता.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना महापुरुषांच्या विचारांचे महत्त्व सांगत त्यांच्या आदर्शांचा अंगीकार करून शिक्षणासोबत चांगले संस्कार जोपासण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमाला सुमित गोरघाटे, अमिश मेश्राम, अंकुश जीवने, नितीन खानोरकर, विलास माऊलीकर, वैभव निमसरकर, विकास निरंजने, साहिल मेश्राम, हर्षल निमसरकर तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील समस्त शिक्षक, शिक्षिका आणि गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी प्रमोद घोरघाटे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत त्यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले.