Home Breaking News • बल्लारपुरात जागतिक लोकसंख्या दिन कार्यक्रम उद्या

• बल्लारपुरात जागतिक लोकसंख्या दिन कार्यक्रम उद्या

23
Oplus_131072

• बल्लारपुरात जागतिक लोकसंख्या दिन कार्यक्रम उद्या

सुवर्ण भारत :  वैभव मेश्राम
प्रतिनिधी, बल्लारपूर

विसापूर : बल्लारपूर पंचायत समिती व तालुका वैद्यकीय कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक लोकसंख्या दिनाचे औचित्य साधून शनिवार ( दि.११ )रोजी दुपारी १२ वाजता राजे खांडक्या बल्लाळशाह सभागृह ,पंचायत समिती मध्ये एक दिवसाची कार्यशाळा आयोजित केली आहे. कार्यशाळेचे उदघाटन गटविकास अधिकारी धनंजय साळवे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
कार्यशाळेत ११ ते १८ जुलै दरम्यान कुटुंब नियोजन प्रक्रिया करण्यासंदर्भात मार्गदर्शन केले जाणार आहे. कुटुंब नियोजन बाबत समुपदेशन,इतर आरोग्य विषयांवर मार्गदर्शन केले जाणार आहे. कार्यशाळेला सरपंच/ प्रशासक, ग्रामपंचायत अधिकारी, आरोग्य सेवक, आरोग्य सहाय्यक, आरोग्य सेविका यांनी उपस्थित राहून सहकार्य करावे ,असे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.आशा साळवे यांनी केले आहे.